पुणे : पुणे रेल्वे स्टेशनवरील (Pune Station) प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर बॉम्ब ठेवला असल्याचा फोन पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला करण्यात आला (Pune Station Bomb Threat) होता. सकाळी ९ वाजता अज्ञात व्यक्तीकडून फोन आल्याची माहिती समोर आली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीचे वय ४० असून तो पिंपरी – चिंचवड भागातील रावेत येथील राहणारा असून त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Pune News)
https://prahaar.in/2024/12/08/pushpa-2-is-a-hit-abroad-too-earns-8-million-in-three-days/
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्षाला सकाळी ९ वाजता अज्ञात व्यक्तीने फोन केला. पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर बॉम्ब ठेवल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तातडीने प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर तपासणी केली. मात्र त्याठिकाणी तसे काही आढळून आले नाही.
फोन करणाऱ्या व्यक्तीची माहिती काढल्यावर तो पिंपरी – चिंचवड भागातील रावेत येथील राहणारा असल्याचे समजले. त्याला तातडीने पिंपरी चिंचवड पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने नशा करून खोडसाळपणे फोन केल्याची माहिती समोर आली आहे. पिंपरी – चिंचवड पोलिसांकडून सदरील व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.