Friday, May 9, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणAssembly election: विधानसभा निवडणुकीत कोकणात महायुतीला ६० पेक्षा जास्त जागा, विनोद तावडेंचा...

Assembly election: विधानसभा निवडणुकीत कोकणात महायुतीला ६० पेक्षा जास्त जागा, विनोद तावडेंचा विश्वास

सिंधुदुर्ग : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत(Assembly election) मुंबई,ठाण्यासह संपूर्ण कोकणात ६०पेक्षा अधिक जागा ह्या महायुतीला मिळणार आहेत. त्‍यामुळे विधानसभेत महायुतीला बहुमत मिळणार असून महाविकास आघाडीचा सुफडा साफ होईल. मुख्यमंत्री पदासाठी किंबहुना सत्तेच्या खुर्चीसाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्‍व सोडले. त्‍याची किंमत त्‍यांना या निवडणुकीतही मोजावी लागेल असे प्रतिपादन भाजपचे राष्‍ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केले.

कणकवलीत प्रहार भवन येथे भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यात श्री.तावडे यांनी मार्गदर्शन केले. त्‍यानंतर त्‍यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्‍यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार आदी उपस्थित होते.

Assembly election 2024: राज्यात महायुतीला कौल!

श्री.तावडे म्‍हणाले, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने फेक नॅरेटिव्ह प्रसारित केले होते. पण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा हा डाव मतदारांनी ओळखला आहे. फक्‍त कोकणपट्ट्यातच महाविकास आघाडीला ६० हून अधिक जागा मिळणार आहेत. तर सिंधुदुर्गात दीपक केसरकर, निलेश राणे यांच्या विजयासह आमदार नितेश राणे यांच्या विजयाची हॅट्‍ट्रीक होणार आहे.

ते म्‍हणाले, केंद्राने राज्‍यात अनेक विकास प्रकल्‍प प्रस्तावित केले आहेत. तर राज्‍य शासनाने लाडकी बहीण योजना आणून अनेक महिलांना आधार दिला आहे. मात्र ही योजना चुकीची असल्‍याचे महाविकास आघाडीकडून सांगून मतदारांशी दिशाभूल करण्याचा प्रयत्‍न केला जात आहे.

श्री तावडे म्हणाले याआधी २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत(Assembly election) आम्ही शिवसेना-भाजप म्हणून एकत्रित लढलो. बहुमतही गाठले. परंतु, उध्दव ठाकरे यांनी गद्दारी केली नसती तर चित्र वेगळे दिसले असते. केवळ एका खुर्चीसाठी ठाकरेंनी हिंदुत्वाची साथ सोडली. दरम्‍यान काँग्रेस पक्षाकडून आम्‍ही घटना बदलणार असे वारंवार सांगितले जात आहे. वस्तुत: यापूर्वी आम्ही बहुमतात दोन वेळा सरकारमध्ये होतो. तेव्हाही घटना बदल करू शकलो असतो. परंतु आम्ही घटना बदलणार नाही आणि ते शक्यही नाही असे ते शेवटी म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -