Home ताज्या घडामोडी दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या मौलवीसह एक तरुण मालेगावातून एटीएसच्या ताब्यात

दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या मौलवीसह एक तरुण मालेगावातून एटीएसच्या ताब्यात

दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या मौलवीसह एक तरुण मालेगावातून एटीएसच्या ताब्यात

मालेगाव : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव सह राज्यातील संभाजीनगर आणि जालना मध्ये एटीएस आणि एनआयएने संयुक्त छापे टाकून मौलवीसह काही तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये मालेगाव मधील एका तरुणांचा समावेश आहे. यामुळे पुन्हा एकदा मालेगाव हे दहशतवादी घटनांची संबंधित असल्याचे समोर आले आहे.

नाशिक जिल्ह्यात काही दिवसापासून सातत्याने दहशतवादी कृत्य करणाऱ्या व्यक्तींच्या हालचाली या सातत्याने वाढत आहेत विशेष करून मालेगाव व नगरच्या परिसरामध्ये या हालचालींना काही दिवसापासून वेग आलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच मधल्या काळात राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणेने छापा टाकून काही जणांना अटक केली होती आता पुन्हा त्याच मालेगाव मध्ये शनिवारी पहाटेच्या सुमारास राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा व दहशतवादी विरोधी पथक यांनी संयुक्त कारवाई करून मालेगाव मधील आझाद रोडवर युनानी क्लिनिक डॉक्टर ए. के. अब्दुल्ला याला अटक केली आहे. तो दहशतवादी संघटनांशी जोडला गेला असल्याची माहिती प्रथमदर्शनी समोर येत आहे. यामुळे पुन्हा एकदा मालेगाव हे दहशतवाद्यांचा केंद्र असल्याची बाब समोर येत आहे.

https://prahaar.in/2024/10/05/nia-and-ats-raids-in-maharashtra/

याबाबत अधिक माहितीनुसार, राष्ट्रीय सुरक्षा तपासणी यंत्रणा व दहशतवाद विरोधी पथक यांनी संयुक्त केलेल्या कारवाई मध्ये संभाजीनगर येथे छापा टाकून आज सकाळी येथील मौलवी हाफीज सह अन्य तीन जणांना ताब्यात घेतलेला आहे. तर जालन्यामध्ये देखील अशीच कारवाई करण्यात आली असून या ठिकाणी देखील काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.