Home ताज्या घडामोडी Accident News : भीषण अपघात! मेळघाटात खाजगी बस पुलाखाली कोसळली

Accident News : भीषण अपघात! मेळघाटात खाजगी बस पुलाखाली कोसळली

0
Accident News : भीषण अपघात! मेळघाटात खाजगी बस पुलाखाली कोसळली

३० ते ४० प्रवासी जखमी

अमरावती : मेळघाटमधील वळण रस्त्यावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील परतवाडा धारणी मार्गावर सेमाडोह जवळ खाजगी बसचा अपघात झाला आहे. मेळघाटमधील वळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस लगतच्या पुलाखाली कोसळली. या अपघातात ३० ते ४० प्रवासी जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमी प्रवाशांवर लगतच्या सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहे.