नवी दिल्ली : मागील काही दिवस जो बायडन यांच्या उमेदवारीवरुन अमेरिकेत जो बायडन यांना पक्षांतर्गंत विरोध होत होता. जो बायडन पुन्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनण्यासाठी उत्सुक होते पंरतु जो बायडन यांना पक्षातून विरोध होत असल्याचे चित्र दिसत होते. जो बायडन यांच्या डेमोक्रॅटस पक्षाने जो बायडन यांच्या उमेदवारीवर अपसंती दाखवली होती. अशातच आता खुद्द जो बायडन यांनी अमेरिकेतील नागरिकांना चिठ्ठी लिहीत आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे.
जगात बळकट अर्थव्यवस्था असलेला देश म्हणून अमेरिकेकडे पाहिले जाते. मागील साडे तीन वर्षाच्या कालावधीत आम्ही देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. अमेरिकेला आणखी विकसित करण्यासाठी देशात मोठ्या गुंतवणूकही आणल्या आहेत. अमेरिकेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारे काही धाडसी निर्णय आम्ही संसदेत घेतले. पुढे बायडन अमेरिकेतील जनतेला संबोधून म्हणाले, तुमच्या शिवाय वैश्विक महामारी आणि आर्थिक संकटातून आपण अमेरिकाला बाहेर काढू शकलो नसतो. राष्ट्रध्यक्ष म्हणून देशाची सेवा करणे माझे मोठे भाग्य होते. पक्षाच्या आणि देशाच्या हिताचा विचार करुन मी निवडणुकीतून माघार घेण्याच्या निर्णय घेत आहे अशी घोषणा जो बायडन यांनी पत्रातून केली आहे.