Home ताज्या घडामोडी पंढरपूरहून परतणा-या वारक-यांच्या गाडीला अपघात

पंढरपूरहून परतणा-या वारक-यांच्या गाडीला अपघात

पंढरपूरहून परतणा-या वारक-यांच्या गाडीला अपघात

गाडी विहिरीत कोसळली, सहा जणांचा मृत्यू; गाडीत १२ लोक असल्याची शक्यता

जालना : पंढरपूर येथून वारीवरून आलेले वारकरी जालना येथून आपल्या गावाकडे जात असताना काळी पिवळी जीप विहिरीत कोसळल्याने सहा जणांचा बुडून मृत्यू झाला. या गाडीत १२ लोक असण्याची शक्यता आहे. त्यापैकी तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. जालन्यातील राजूर रोड वरील तुपेवाडी फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला.

तुपेवाडी जवळ या जीप वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच असलेल्या विहिरीत जाऊन ही जीप कोसळली. ग्रामस्थ आणि पोलिसांकडून गाडीतील प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत ६ मृतदेह हाती आली असून तीन जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे. या तिघांवर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.