Home ताज्या घडामोडी Dibrugarh Express : उत्तर प्रदेशमध्ये दिब्रुगड एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले

Dibrugarh Express : उत्तर प्रदेशमध्ये दिब्रुगड एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले

Dibrugarh Express : उत्तर प्रदेशमध्ये दिब्रुगड एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले

गोंडा : उत्तर प्रदेशातील गोंडा येथे गुरुवारी मोठा रेल्वे अपघात झाला. चंदीगडहून दिब्रुगडला (Dibrugarh Express) जाणाऱ्या दिब्रुगढ एक्स्प्रेसचे प्राथमिक माहितीनुसार, १०-१२ डबे रुळावरून घसरले आहेत. ही अपघाताची घटना गोंडा-मनकापूर स्टेशनजवळ घडली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

दिब्रुगड एक्स्प्रेस (१५००४) ही ट्रेन गुरुवारी रात्री ११.३९ वाजता चंदीगडहून सुटली. गुरुवारी दुपारी ही ट्रेन गोंडा-मानकापूर स्थानकावर आली असता एक्स्प्रेसचे काही डबे अचानक रुळावरून घसरले. गाडी रुळावरून घसरल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. प्रवाशांनी घाबरून आरडाओरड करत ट्रेन थांबताच प्रवासी बाहेर आले.