Home महाराष्ट्र कर्जत-पळसदरी-खोपोली रस्त्यावर खड्डेच खड्डे!

कर्जत-पळसदरी-खोपोली रस्त्यावर खड्डेच खड्डे!

कर्जत-पळसदरी-खोपोली रस्त्यावर खड्डेच खड्डे!

केळवली परिसरात रात्रीच्या वेळी प्रवास करणे ग्रामस्थांना झाले धोकादायक

कर्जत : तालुक्यातून कर्जत-पळसदरी-खोपोली हा रस्ता पुण्याकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग समजला जातो. बहुसंख्य ठिकाणी काँक्रीटचा असलेल्या या रस्त्यावर अल्प ठिकाणी डांबरी रस्ता आहे. या रस्त्यावर केळवली परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रात्रीच्या वेळी या रस्त्याने प्रवास करणे धोकादायक बनले आहे. या रस्त्याने राज्याचे मुख्यमंत्री कर्जत येथे आले होते आणि त्यावेळी मुख्यमंत्र्यांचे वाहनांसाठी हा रस्ता नव्याने डांबरी करण्यात आला होता.

कर्जत तालुक्यातून पुण्याकडे जाणारी वाहने कर्जत खोपोली रस्त्याने जात असतात. त्यात ठाणे जिल्ह्यातील वाहने आणि नाशिक जिल्ह्यातून येणारी वाहने देखील अलिबाग, पेण आणि कोकणात जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात. या रस्त्यावरील डांबरी भाग सध्या धोकादायक बनला आहे. रात्रीच्या वेळी तर या रस्त्याने वाहतूक करणाऱ्या दुचाकी वाहनधारक यांच्यासाठी हा रास्ता धोकादायक बनला आहे. रस्त्यावर मोठं मोठे खड्डे बनले असून रात्रीच्या वेळी वाहने रस्त्यातून जाताना हेड लाईट मुळे दुचाकी धारकांना अपघात होत आहेत. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे यापूर्वी एक दोन जणांना प्राण गमवावे लागले आहेत. याच रस्त्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जानेवारी महिन्यात कर्जत शहरात आले होते. त्यावेळी कर्जत खोपोली रस्त्याची डागडुगी करण्यात आली होती. तर डांबरी भाग नव्याने तयार करण्यात आला होता.

आता त्याच डांबरी रस्त्याने भीषण रूप धारण केले असून दुचाकी यांच्यासाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे. त्यात केळवली परिसरात हा रस्ता दुपदरी नसल्याने सर्व वाहने एकाच रस्त्याने ये – जा करीत असतात.त्यावेळी खड्डे चुकविण्यासाठी वाहनचालक हे आपली लेन सोडून वाहने काढण्याचा प्रयत्न करतात.त्यावेळी अपघात होण्याची जास्त शक्यता असते.

प्रशासन लक्ष देईल का?

‘कर्जत-खोपोली रोड केलवळी येथे रोडमध्ये मोठ मोठे खड्डे पडले आहेत. यामध्ये गाडी चालवताना चालकाला मोठी कसरत करावी लागत आहे. मोटार सायकलवरून पडून अनेक जण जखमी होत आहेत. याकडे प्रशासन लक्ष देईल का?’, असे कर्जत तालुक्यातील भाजपा सरचिटणीस, वसंत महाडिक यांनी म्हटले.