Home क्रीडा द.आफ्रिकेसमोर श्रीलंकेने टेकले गुडघे, ६ विकेटनी आफ्रिकेचा विजय

द.आफ्रिकेसमोर श्रीलंकेने टेकले गुडघे, ६ विकेटनी आफ्रिकेचा विजय

द.आफ्रिकेसमोर श्रीलंकेने टेकले गुडघे, ६ विकेटनी आफ्रिकेचा विजय

न्यूयॉर्क: आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्डकप २०२४च्या(t-20world cup 2024) चौथ्या सामन्यात द. आफ्रिकेने श्रीलंकेला ६ विकेटनी हरवले. ग्रुप डीमद्ये हा सामना ३ जूनला न्यूयॉर्कच्या नसाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. सामन्यात आफ्रिकेला विजयासाठी केवळ ७८ धावा हव्या होत्या. हे आव्हान त्यांनी १७ षटकांतच पूर्ण केले.

सामन्यात टॉस जिंकत श्रीलंकेचा कर्णधार वानिंदु हसरंगाने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला. श्रीलंकेचा संघ सुरूवातीपासूनच विकेट गमावत होता. त्यांना १९.१ षटकांत केवळ ७७ धावा करता आल्या. श्रीलंकेसाठी कुसल मेंडिसने सर्वाधिक १९ धावा केल्या. याशिवाय अँजेलो मॅथ्यूज आणि कामिंदू मेंडिस यांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. चार फलंदाजांना खातेही खोलता आले नाही.

आफ्रिकेकडून वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्कियाने जबरदस्त कामगिरी केली. त्याने चार षटकांत सात धावा देत चार विकेट मिळवल्या. कॅगिसो रबाडा आणि केशव महाराज यांनाही प्रत्येकी दोन विकेट मिळवता आल्या. तर ओटनील बार्टमॅनने एक विकेट मिळवली. तर श्रीलंकेचा एक खेळाडू रनआऊट झाला.