Home ताज्या घडामोडी झोपताना AC किती डिग्रीवर ठेवावा? जाणून घ्या

झोपताना AC किती डिग्रीवर ठेवावा? जाणून घ्या

झोपताना AC किती डिग्रीवर ठेवावा? जाणून घ्या

मुंबई: सध्या देशभरात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतोय. भीषण उन्हाने साऱ्यांचीच काहिली केली आहे. त्यातच एसीमध्ये राहिल्याने शरीराला थंडावा मिळतो. दिवसा आपण एसी लावला तरी त्याचे तापमान आपल्या हिशेबाने आपण कमी जास्त करू शकतो.

दरम्यान, अनेकांच्या मनात असा सवाल येतो की एसीचे तापमान रात्री झोपताना किती असावे. हे जाणून घेणे गरजेचे असते. रात्रीच्या वेळेस एसीचे तापमान २४ डिग्री सेल्सियस असणे चांगले असते.

हे तापमान शरीर आणि आरोग्यासाठी चांगले असते. यामुळे कडाक्याच्या उन्हामुळे दिलासा मिळतो. सोबतच विजेची बचतही होते.

जर तुम्ही २४ डिग्री सेल्सियसवर तुमचा एसी चालवत असाल तर यासोबत पंखाही चालवू शकता. यामुळे थंड हवा सगळीकडे फिरत राहील.

दरम्यान, रात्रभर एसी सुरू ठेवणे नुकसानदायक असते. यामुळे काही वेळ एसी चालू ठेवून बंद केला पाहिजे. यामुळे रात्रभर थंड हवा येत राहील.