Home महाराष्ट्र ठाणे ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी आज सहा उमेदवारांचे अर्ज दाखल

ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी आज सहा उमेदवारांचे अर्ज दाखल

ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी आज सहा उमेदवारांचे अर्ज दाखल

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी आज विविध पक्षांच्या चार उमेदवारांनी तर दोन अपक्ष उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज २५ – ठाणे लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांच्याकडे उमेदवारी सादर केले. तर आज दुपारी तीन वाजेपर्यंत १२ नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले.

आज दाखल केलेल्या अर्जामध्ये भारतीय जवान किसान पार्टीचे उमेदवार राजेंद्र रामचंद्र संखे, रिपब्लिकन बहुजन सेनेचे विजय ज्ञानोबा घाटे, पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकचे उमेदवार उत्तम किसनराव तिरपुडे, हिंदु समाज पार्टीचे उमेदवार भवरलाल खेतपाल मेहता तर राजीव कोंडिबा भोसले व खाजासाब रसुलसाब मुल्ला या दोन अपक्ष उमेदवारांनी २५ ठाणे लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले.

आज दुपारी तीन वाजेपर्यंत १२ नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले.

  • शिवसेना (शिंदे गट) – ४
  • भारत महापरिवार पार्टी – १
  • वंचित बहुजन आघाडी – ३
  • बहुजन समाज पार्टी – २
  • भीमसेना – १
  • अपक्ष – १