Home ताज्या घडामोडी Indian Navy : भारतीय नौदलाचा खलाशी २७ फेब्रुवारीपासून नौदलाच्या जहाजातून बेपत्ता!

Indian Navy : भारतीय नौदलाचा खलाशी २७ फेब्रुवारीपासून नौदलाच्या जहाजातून बेपत्ता!

Indian Navy : भारतीय नौदलाचा खलाशी २७ फेब्रुवारीपासून नौदलाच्या जहाजातून बेपत्ता!

मोठ्या प्रमाणावर शोधमोहिम सुरु

मुंबई : भारतीय नौदलातून (Indian Navy) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एक खलाशी (Navy sailor) २७ फेब्रुवारीपासून नौदलाच्या जहाजातून (Navy ship) बेपत्ता असल्याची माहिती मिळाली असून त्याचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, वेस्टर्न नेव्हल कमांडने सांगितले की, साहिल वर्मा असे नाविकाचे नाव असून या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

नौदल कमांडने सांगितले की, ‘या घटनेत साहिल वर्मा २७ फेब्रुवारी २०२४ पासून तैनात असताना भारतीय नौदलाच्या जहाजातून समुद्रात बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे.’ “नौदलाने जहाजे आणि विमानांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू करण्यात केली आहे,” कमांडने ‘X’ वर एका पोस्टमध्ये म्हटलंय की, ‘या घटनेची नेमकी परिस्थिती सध्या माहित नाही. ‘नेव्हल बोर्ड ऑफ इन्क्वायरी’ला सविस्तर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.’