Home क्रीडा IPLमध्ये धोनीच्या जर्सीचा फर्स्ट लूक, CSKने शेअर केला व्हिडिओ

IPLमध्ये धोनीच्या जर्सीचा फर्स्ट लूक, CSKने शेअर केला व्हिडिओ

IPLमध्ये धोनीच्या जर्सीचा फर्स्ट लूक, CSKने शेअर केला व्हिडिओ

मुंबई: महेंद्रसिंग धोनीच्या आयपीएल २०२४मधील जर्सी कशी असणार याचा लूक समोर आला आहे. चेन्नई सुपर किंग्सने ही लाँच केली आहे. चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात माहीच्या जर्सीची पहिली झलक दिसत आहे.

धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने ५ वेळा आयपीएलचा खिताब जिंकला होता. २०२३मध्ये चेन्नईचा संघ चॅम्पियन बनला होता. धोनीने २००८मध्ये पहिल्यांदा चेन्नईचे नेतृत्व केले. दोनवेळा टी-२० चॅम्पियन्स लीगचा खिताबही त्याच्या नेतृत्वात चेन्नईने जिंकला.

 

आयपीएलचे चाहते थाला धोनीच्या पुनरागमनची प्रतीक्षा करत आहेत. आयपीएल २०२३ दरम्यान धोनीने अशी घोषणा केली होती की तो कमीत कमी एक हंगाम आणखी खेळणार.

धोनीने २५० आयपीएल सामन्यांमध्ये ५०८२ धावा केल्या आहेत. यात १४२ कॅच आणि ४२ स्टम्पसचा समावेश आहे.