Home ताज्या घडामोडी Gold: जगातील या देशांकडे आहे सर्वाधिक सोने, भारताकडे किती?

Gold: जगातील या देशांकडे आहे सर्वाधिक सोने, भारताकडे किती?

मुंबई: आज आम्ही तुम्हाला जगातील त्या देशांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्याकडे सोन्याचे मोठे भंडार आहे.

अमेरिका – जगातील सर्वाधिक सोने अमेरिकेत आहे. फोर्ब्सकडून तयार करण्यात आलेल्या यादीत ८,१३६. ४६ टन भंडारसह अमेरिका पहिल्या स्थानावर आहे.

जर्मनी – युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश सोन्याच्या भंडारच्या बाबतीत अमेरिकेच्या मागे आहे. जर्मनीकडे ३,३५२.६५ टन सोन्याचे भंडार आहे.

इटली – सोन्याचे मोठे भंडार असलेल्या यादीत इटली तिसऱ्या स्थानावर आहे. फोर्ब्सनुसार या युरोपीय देशाकडे २,४५१.८४ टन सोन्याचे भंडार आहे.

फ्रान्स – चौथ्या स्थानावर आणखी एक युरोपीय देश आहे. फ्रान्सकडे सोन्याच्या भंडारात २,४३६.८८ टन सोने आहे.

रशिया – जगातील शक्तिशाली देशांपैकी एक रशियाकडे २,३३२.७४ टन सोन्याचे भंडार आहे. यासोबतच रशिया पाचव्या स्थानावर आहे.

चीन – चीन याबाबतीत यादीत सहाव्या स्थानावर आहे. चीनकडे सध्या भंडारात २,१९१.५३ टन सोने आहे.

स्वित्झर्लंड – सर्वात विशाल स्वर्ण भांडारच्या बाबतीत स्वित्झर्लंड सातव्या स्थानावर आहे. या युरोपीय देशाच्या भंडारात १,०४० टन सोने आहे.

जपान – आशियातील दुसरी सगळ्यात मोठी अर्थ व्यवस्था आणि जगातील पाचवी अर्थव्यवस्था असलेल्या जपानकडे ८४५. ९७ टन सोन्याचे भंडार आहे.

भारत – सोन्याच्या भंडाराच्या बाबतीत भारत खूप मागे आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार भारताच्या भंडाराध्ये ८००.७८ टन सोने आहे. या यादीत भारत नवव्या स्थानावर आहे.