Home ताज्या घडामोडी लसूण चोरीच्या संशयातून बोरिवलीत तरुणाची हत्या

लसूण चोरीच्या संशयातून बोरिवलीत तरुणाची हत्या

0
लसूण चोरीच्या संशयातून बोरिवलीत तरुणाची हत्या

मुंबई : लसूण चोरीचा संशयातून बोरिवली पश्चिम येथे एकाची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंकज मंडल असे या ४६ वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. पाच महिन्यांपासून लसूण चोरी करत असल्याच्या संशय आल्याने रागाच्या भरात घनश्याम खाकरोडिया या लसूण विक्रेत्याने पंकजची हत्या केली.

ही घटना बोरिवलीच्या एमके भाजी मार्केटमध्ये घडली. या प्रकरणी घनश्याम खाकरोडिया या लसूण विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास बोरीवली पोलीस करत आहेत.