Home साप्ताहिक कोलाज Navratri poems : काव्यरंग

Navratri poems : काव्यरंग

Navratri poems : काव्यरंग

दसरा

चैतन्य उधळीत
दिवस उगवला हसरा
उत्सव आनंदाचा
घेऊन आला दसरा

रांगोळी शोभे अंगणी
झेंडूचे तोरण दारी
स्नेहभाव वाढवूनी
कटुता विसरूया सारी

आपट्याची पानं
सोनं म्हणून लुटूया
सुख-समाधान
एक दुसऱ्याला वाटूया

श्रीरामाचा आदर्श घेऊनी
अहंकाराचा करूया नाश
एकतेचा मंत्र जपूनी
तोडूया विषमतेचे पाश

आदराने नमस्कार करूनी
थोरांना देऊया मान
मराठी सणांचा
आम्हा सदा अभिमान

– रवींद्र व्ही. चालीकवार, महागाव, जि. यवतमाळ

नारीशक्तीला सलाम!!

नवरात्रीच्या नऊ नारी
आहेत लय भारी…

पहिला मान –
आपल्या हृदयी आईला
तिने शिकविले बोलायला…

दुसरा मान –
आपल्या क्रांतिज्योती सावित्री मातेला
तिने शिकविले लिहायला…

तिसरा मान –
आपल्या राष्ट्रमाता जिजाऊ मातेला
तिने शिकविले
न्याय करायला…

चौथा मान –
आपल्या त्यागमूर्ती
रमाई मातेला
तिने शिकविले त्यागातून प्रोत्साहन द्यायला…

पाचवा मान –
आपल्या राजमाता अहिल्यामातेला
तिने शिकविले समानतावादी राहायला…

सहावा मान –
आपल्या झाशीची
राणी लक्ष्मीमातेला
तिने शिकविले अत्याचाराशी लढायला…

सातवा मान –
आपल्या ऑफिस
बाॅस मॅडमला
तिने शिकविले
वेळेवर यायला…

आठवा मान –
आपल्या सर्व शेजारणींला
तिने शिकविले सहकार्य करायला…

आणि शेवटचा
नववा मान –
समस्त सर्व पत्नीवर्गाला
तिने शिकविले
तडजोड करायला…

~ विलास देवळेकर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra