Home ताज्या घडामोडी वाडा-मनोर महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी

वाडा-मनोर महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी

0
वाडा-मनोर महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी

वाडा: राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. वाडा मनोर महामार्गावर धनानी मोटर्सजवळ जोरदार पावसामुळे झाड कोसळल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.

सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने कोसळले झाड

बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. सोसाट्याचा वारा तसेच जोरदार पाऊस झाल्याने वाडा मनोर महामार्गावर झाड आडवे पडले. यामुळे संपूर्ण रस्त्यावरून एकाच मार्गाने वाहतूक सुरू होती.

झाड रस्त्याच्या मध्यभागीच कोसळल्याने या महामार्गावरील वाहतूक काळी काळ ठप्प होती. दरम्यान, या मार्गावरील झाड दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.