Home ताज्या घडामोडी Crime news : कार चोरीच्या उद्देशाने पालघरमधील चालकाची हत्या

Crime news : कार चोरीच्या उद्देशाने पालघरमधील चालकाची हत्या

Crime news : कार चोरीच्या उद्देशाने पालघरमधील चालकाची हत्या

पालघर : भाड्याने घेतलेल्या कारच्या चालकाची हत्या करत मृतदेह त्र्यंबकेश्वरच्या आंबोली घाटात फेकून कार घेऊन पसार झालेल्या तीन आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे.

पाच दिवसांपूर्वी पालघरमधील कार चालक आसिफ शेख याची अर्टिका कार भाड्यावर घेऊन तीन आरोपी नाशिककडे निघाले होते. मात्र कार चोरण्याच्या उद्देशाने रस्त्यातच या आरोपींनी कार चालकाची हत्या करुन त्याचा मृतदेह आंबोली घाटात फेकला.

यानंतर कारचे मालक आणि मृत कार चालकाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीनंतर पालघर पोलिसांनी कसुन शोध घेत पहिल्या आरोपीला ओडिसातून तर दुसऱ्या आरोपीला नागपूर येथून चालत्या ट्रेन मधून अटक केली.

या प्रकरणात तिसऱ्या आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरु असून अर्टिका कार देखील ताब्यात घेतली आहे. कार चालकाची झालेली हत्या ही कार चोरण्याच्या उद्देशानेच करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.