Home क्रीडा बाबर आझमकडे पाकिस्तान संघाचे नेतृत्व

बाबर आझमकडे पाकिस्तान संघाचे नेतृत्व

बाबर आझमकडे पाकिस्तान संघाचे नेतृत्व

आशिया चषकासाठी पाक संघात युवा खेळाडूंना संधी

कराची (वृत्तसंस्था) : ३० ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या आशिया चषकासाठी पाकिस्तान क्रिकेट संघाची घोषणा बुधवारी करण्यात आली. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे. पीसीबीने १७ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. पीसीबीने आशिया चषक तसेच अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी समान संघाची घोषणा केली.

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तैब ताहिर, सौद शकील (फक्त अफगाणिस्तान मालिकेसाठी), मोहम्मद रिझवान, मोहम्मद हरिस, मोहम्मद नवाज, उस्मा मीर, फहीम अश्रफ, हारिस रौफ, मोहम्मद वसीम जुनियर, नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी असा पाकिस्तानचा १७ खेळाडूंचा संघ आहे.

बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघ ३० ऑगस्ट रोजी मुलतान येथे नेपाळविरुद्ध आशिया चषकात पहिला सामना खेळणार आहे. यानंतर संघ २ सप्टेंबरला भारताविरुद्ध खेळणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra