Home ताज्या घडामोडी लबाड लांडगा ढोंग करतंय- आशीष शेलार यांचे टीकास्त्र

लबाड लांडगा ढोंग करतंय- आशीष शेलार यांचे टीकास्त्र

लबाड लांडगा ढोंग करतंय- आशीष शेलार यांचे टीकास्त्र

मुंबई : टोल बंदची घोषणा करणाऱ्या आदित्य ठाकरेंवर भाजपचे मुंबई अध्यक्ष आषीश शेलार यांनी निशाणा साधला. गेल्या पंचवीस वर्षात मुंबईत रस्त्यावर खड्डे पडले, मुंबईची तुंबई झाली, अनेकजण मॅनहोलमध्ये पडून वाहून गेले, २६ जुलैला तर अनेकांची आयुष्ये उद्ध्वस्त झाली. झाड पडून काहीजण गेले, संडासचा स्लॅब कोसळून काही मुंबईकर चिरडले, तेव्हा मुंबईचे हे तथाकथित कारभारी युवराज म्हणाले नव्हते की, मुंबईकरहो तुम्हाला सेवा देण्यात आम्ही, मी कमी पडलो. तुम्ही पालिकेला कर देणे बंद करा. आणि आज सांगतात, रस्त्यावर खड्डे पडले म्हणून टोल भरु नका. हे मुंबईकरांच्या कैवाराचे सोंग आहे. लबाड लांडगा ढोंग करतोय आणि मुंबईच्या कैवाराचे सोंग करतोय, असे टीकास्त्र आशीष शेलार यांनी सोडले!

मुंबई महापालिकेत औषधाच्या नावावर होत असलेल्या लुटीबद्दल गेली २० वर्षे आम्ही सातत्याने बोलत आहोत. मुंबई शहराची लोकसंख्या दीड कोटीच्या आसपास आहे. त्यातील ४०-४५ लाख मुंबईकर महापालिकेच्या रुग्णालयांत औषधोपचार घेतात आणि एका वर्षाला चार हजार कोटी खर्च होत आहेत. म्हणजे पाच वर्षाला २० हजार कोटी खर्च होत आहेत. तरीही औषधे मिळत नाही. त्याची क्वॉलिटी योग्य नाही. टेस्ट होत नाहीत. या सर्वांची चौकशी व्हावी अशी आम्ही मागणी केल्यानेच आता चौकशी होत असल्याचे शेलार म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra