Home महाराष्ट्र सांधण दरीत अडकलेले ५०० पर्यटक सुखरूप

सांधण दरीत अडकलेले ५०० पर्यटक सुखरूप

सांधण दरीत अडकलेले ५०० पर्यटक सुखरूप

भंडारदरा : अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा येथे काजवा महोत्सवाला गेलेले ५०० पर्यटक अचानक आलेल्या पावसामुळे ‘सांधण व्हॅली’ म्हणजे सांधण दरीत अडकले होते. परंतु वेळीच मदत मिळाल्याने सर्व पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा येथील कळसुबाई – हरिश्चंद्रगड अभयारण्यातील निसर्गाच्या कुशीत असलेल्या साम्रद गावाच्या शिवारात ही जगप्रसिद्ध दरी आहे. पर्यटक मोठ्या संख्येन येथे ट्रॅकिंगसाठी येत असतात.

सध्या भंडाऱ्यामध्ये काजवा महोत्स सुरु आहे. त्यामुळे हा महोत्सव पाहण्यासाठी आणि काल रविवार असल्याने येथे पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. त्यातील जवळपास ५०० पर्यटक दरीत अडकले होते. परंतु त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

हे पण वाचा – मान्सूनपूर्व वादळामुळे राज्यात हाहाकार! राज्यभरात हजारो वृक्ष कोसळले, ९ जण दगावले; विदर्भ, खान्देशालाही तडाखा

जवा महोत्सव त्यातच शनिवार आणि रविवार दोन दिवस सलग सुट्या आल्याने महोत्सवासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. सर्वत्र लोकच दिसत होते. काही पर्यटकांनी शनिवारी रात्री काजवा महोत्सवाचा आनंद घेतला होता. तर काही पर्यटक रविवारी रात्री महोत्सव पाहण्यासाठी तेथे थांबले होते. हे पर्यटक रविवारी सायंकाळी आशिया खंडातील सर्वात मोठी सांधण दरी पाहण्यासाठी गेले आणि अचानक सोसाट्याचा वारा आणि पाऊस आल्याने हे सर्व पर्यटक त्या दरीत अडकले. परंतु वेळीच मदत मिळाल्याने सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.