Home ताज्या घडामोडी Nashik Breaking : नाशिकमध्ये पोलिसांच्या विशेष पथकावर हल्ला

Nashik Breaking : नाशिकमध्ये पोलिसांच्या विशेष पथकावर हल्ला

Nashik Breaking : नाशिकमध्ये पोलिसांच्या विशेष पथकावर हल्ला

नाशिक : नाशिकमध्ये अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याच्या हेतूने पोलीस अधिक्षकांनी गठीत केलेल्या विशेष पथकावर समाजकंटकांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे.

सायंकाळी चार वाजेच्या सुमारास दिंडोरी तालुक्यातील वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोशिंबे गावात हा निषेधार्ह प्रकार घडल्याचे वृत्त आहे.

हल्लेखोर दारूचा अवैध व्यवसाय करीत असल्याचा संशय असून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी हे पथक रवाना झाले होते. यासंदर्भात अधिक तपशील मिळू शकला नाही.