Home ताज्या घडामोडी पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या कुटूंबियांना २ लाख तर जखमींना ५० हजारांची मदत जाहीर

पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या कुटूंबियांना २ लाख तर जखमींना ५० हजारांची मदत जाहीर

पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या कुटूंबियांना २ लाख तर जखमींना ५० हजारांची मदत जाहीर

नवी दिल्ली : जुन्या पुणे-मुंबई हायवेवर खाजगी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चार वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

या घटनेनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच मोदींनी मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे तर जखमींच्या कुटूंबियांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, रायगडच्या बस अपघातात मृत्यू पावल्याची घटना दुर्दैवी आहे. ज्या लोकांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. जखमी झालेले प्रवासी लवकरात लवकर बरे होतील, अशी आशा आहे.