Home ताज्या घडामोडी सत्तासंघर्षाची सुनावणी संपली, आता निकालाकडे लक्ष!

सत्तासंघर्षाची सुनावणी संपली, आता निकालाकडे लक्ष!

सत्तासंघर्षाची सुनावणी संपली, आता निकालाकडे लक्ष!

निकाल ठेवला राखून

नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी ९ महिन्यांनंतर संपली असून सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने या याचिकांवर निर्णय राखून ठेवला आहे.

खरी शिवसेना कोणती ठाकरेंची की शिंदेंची यासंदर्भातील एकूणच सगळ्या खटल्यांची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयातील पाच सदस्यांच्या घटनापीठापुढे पूर्ण झाली. यावेळी आपल्या प्रतिवादाचा शेवट करताना ठाकरे गटाच्या वकीलांनी संस्कृत सुभाषित बोलून न्यायालय योग्य न्याय करील असे म्हटले.

संसदीय पक्षाला स्वतःची अशी ओळख नसते. संसदीय पक्ष हा फक्त पक्षाचा काही भाग असतो. तसेच संसदीय पक्षातील सदस्यांवर पक्षाचे धोरण पाळणे बंधनकारक असते. ते स्वतः कोणताही निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकत नसतात. त्यामुळेच प्रतोद नियुक्ती पक्ष करतो. संसदीय पक्ष नाही. त्यामुळे शिंदे ठाकरे खटल्यात शिंदे गटाने मांडलेले सर्व मुद्दे निरर्थक ठरतात, असे ठाकरे गटाचे वकील सिंघवी यांनी स्पष्ट केले.