Home क्रीडा दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात २९३ धावा

दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात २९३ धावा

दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात २९३ धावा

जोहान्सबर्ग: दक्षिण आफ्रिकेने मालिकेतील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजविरोधात अखेरची बातमी हाती आली, तेव्हा पाच बाद २९३ धावा केल्या होत्या. व्हिआन मल्डर आणि हेन्रिच क्लासन ही दक्षिण आफ्रिकेची जोडी अनुक्रमे ५ आणि ८ धावांवर खेळत होती.

द. आफ्रिकेची सुरूवात दमदार झाली. पहिल्या विकेटसाठी डीन एल्डर आणि एडन मॅक्रम यांनी ७६ धावांची भागीदारी केली होती. मॅक्रम नंतर मोटीच्या गोलंदाजीवर ब्लॅकवुडच्या हाती झेल देऊन ९६ धावांवर बाद झाला. त्याचे शतक अवघ्या चार धावांनी हुकले. टोनी डे झोर्झी याने ८५ धावा केल्या. त्याच्या यष्ट्या मोटीनेच उडवल्या. त्यानंतर मात्र दक्षिण आफ्रिकेच्या डावाची घसरगुंडी उडाली. वेस्ट इंडिजच्या वतीन केमार रोचन तीन गडी बाद केले तर अल्झारी जोसेफने दोघांना तंबूचा रस्ता दाखवला.