Home ताज्या घडामोडी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या नेमणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या नेमणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या नेमणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या नेमणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या समितीच्या सल्ल्यानुसार निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी समिती नेमणार असल्याची माहिती सुप्रीम कोर्टाने दिली आहे. आता निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नेमणुकीसाठी पंतप्रधान, विरोधी पक्षनेते सरन्यायाधीश यांची समिती राष्ट्रपतींकडे शिफारस करणार आहे. सध्या केवळ पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती नेमणुका करत होते.