Home महाराष्ट्र ठाणे भिवंडीतील घरफोडी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

भिवंडीतील घरफोडी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

0
भिवंडीतील घरफोडी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

भिवंडी : भिवंडी शहरातील आदर्श पार्क येथील ‘डी विंग १’ मधील दुसऱ्या मजल्यावर फ्लॅटचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. या घरफोडीचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे.

आदर्श पार्क मधील रहिवासी विजय टाचिरते हे आपल्या कुटुंबासोबत बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत घरातील लॅपटॉप, सोन्याचे दागिने व काही रोख रक्कम चोरी केल्याचे संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे.

गेल्या महिन्यात सुद्धा शेजारील इमारतीमध्ये चोरट्याने चोरी केल्याची घटना घडली होती, अशी माहिती रहिवाशांकडून सांगण्यात आली. यामुळे स्थानिक आदर्श पार्क रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.