Sunday, May 12, 2024
Homeक्रीडाराजस्थानचा रॉयल विजय

राजस्थानचा रॉयल विजय

बंगळूरुला नमवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध कृष्णा, ओबेड मॅकॉय यांची अप्रतिम गोलंदाजी आणि जोस बटलरच्या धडाकेबाज (नाबाद १०६ धावा) फलंदाजीच्या जोरावर राजस्थानने बंगळूरुला सहज नमवत आयपीएल २०२२ मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला. रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात आता राजस्थानसमोर पुन्हा गुजरातचे आव्हान आहे.

१५८ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानला फारसे कष्ट करावे लागले नाहीत. यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलरने धडाकेबाज सुरुवात करत सामन्यावर पकड केली. या जोडीने संघाला धावांचे नाबाद अर्धशतक पार करून दिले. संघाची धावसंख्या ६१ असताना यशस्वीच्या रुपाने बंगळूरुला पहिले यश मिळाले. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. विजय राजस्थानच्या आवाक्यात आला होता. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनने जोस बटलरला साथ देत राजस्थानला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. बटलरने नाबाद शतक झळकावत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब करत अंतिम फेरीत प्रवेश केला. राजस्थानच्या विजयात जोस बटलर चमकला. त्याने ६० चेंडूंत नाबाद १०६ धावा तडकावल्या. राजस्थानने विजयी लक्ष्य ३ फलंदाजांच्या बदल्यात १८.१ षटकांत पूर्ण केले. पराभवामुळे बंगळूरुचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

प्रथम फलंदाजीला आलेल्या बंगळूरुच्या रजत पाटीदारची बॅट शुक्रवारीही तळपली. त्याने ४२ चेंडूंत संघातर्फे सर्वाधिक ५८ धावा तडकावल्या. त्यातल्या त्यात फाफ डु प्लेसीस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी बरी कामगिरी केली. फाफ डु प्लेसीसने २५ धावा जमवल्या, तर मॅक्सवेलने १३ चेंडूंत झटपट २४ धावा ठोकल्या. बंगळूरुच्या उर्वरित फलंदाजांनी मात्र निराशा केली. त्यामुळे बंगळूरु २०० च्या जवळपास धावा जमवले, अशी सुरुवातीला असलेली अपेक्षा शेवटी मात्र त्यांना पूर्ण करण्यात अपयश आले.

पाटीदार बाद झाल्यानंतर शेवटच्या ५ षटकांत बंगळूरुच्या फलंदाजांना धावांचा वेग वाढवता आला नाही. अपेक्षा असलेले दिनेश कार्तिक, महिपल लोमरोर यांनी निराशा केली. त्यामुळे २० षटकांअखेर ८ फलंदाजांच्या बदल्यात बंगळूरुने १५७ धावा उभारता आल्या. राजस्थानच्या प्रसिद्ध कृष्णा, ओबेड मॅकॉय यांनी अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन केले. या जोडीने बळी मिळवत धावाही रोखण्यात यश मिळवले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -