Monday, May 13, 2024
Homeक्रीडाआयपीएलसाठी सूर्यकुमारसह पंड्या बंधूंना रोहित शर्माची पसंती

आयपीएलसाठी सूर्यकुमारसह पंड्या बंधूंना रोहित शर्माची पसंती

मुंबई (प्रतिनिधी): आयपीएलच्या आगामी हंगामामध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला त्यांच्या मुख्य खेळाडूंना पुढील हंगामासाठी मुंबईच्या ड्रेसिंगरूममध्ये परत आणण्याची इच्छा आहे. त्यात अष्टपैलू हार्दिक आणि कृणाल पंड्या बंधूंसह कीरॉन पोलार्ड तसेच वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराला पसंती दर्शवली आहे.

आयपीएलचा यंदाचा हंगाम पाच वेळा जेतेपद जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघासाठी सर्वोत्तम नव्हता. असे असले तरी हा संघ लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. रोहित शर्मा २०११ मध्ये जोडला गेला. २०१३ मध्ये, त्याने मधल्या हंगामापासून कर्णधारपद स्वीकारले आणि त्याच वर्षी संघाला चॅम्पियन बनवले. गेल्या दोन हंगामांमध्ये विजय मिळवल्यानंतर मुंबई या वेळी प्ले-ऑफसाठी पात्र ठरू शकली नाही.

आयपीएल २०२२मध्ये सर्व संघात नवीन खेळाडूंची भरणा होणार आहे. मेगा ऑक्शनमध्ये प्रत्येक संघाला दोन किंवा तीन खेळा़डूंना कायम ठेवता (रिटेन) येईल. त्यामुळे प्रमुख क्रिकेटपटूंना कायम ठेवण्यासाठी प्रत्येक फ्रँचायझी उत्सुक आहे. दोन नवीन संघ स्पर्धेत प्रवेश करत असल्याने, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) नवीन फ्रँचायझींना लिलावात दर्जेदार खेळाडू निवडण्याची उज्ज्वल संधी देण्यासाठी कठोर रिटेन्शन पॉलिसी लागू करू शकते. अशा परिस्थितीत दोन नवीन संघांना लिलावात सहभागी होणाऱ्या खेळाडूंची निवड करण्याची संधी असेल.

सध्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेसाठी भारतीय संघासोबत आहे. विराट कोहलीची कर्णधार म्हणून ही शेवटची स्पर्धा असल्याने रोहित टी-२० मध्ये भारताचा कर्णधार होण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -