Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीRight to Abortion : गर्भपात हा महिलांना घटनात्मक अधिकार देणारा फ्रान्स ठरला...

Right to Abortion : गर्भपात हा महिलांना घटनात्मक अधिकार देणारा फ्रान्स ठरला जगातला पहिला देश!

पॅरिस : महिलांना गर्भपात (Abortion) करण्याचा घटनात्मक अधिकार (Constitutional Right) देणारा फ्रान्स (France) हा जगातील पहिला देश ठरला आहे. फ्रान्समध्ये (Right to Abortion) या निर्णयाचे एकीकडे स्वागत करत त्याला ऐतिहासिक निर्णय म्हटले जात आहे तर गर्भपात विरोधी असलेल्या लोकांकडून या निर्णयाचा विरोध केला जात आहे.

फ्रान्समध्ये संविधानात आता गर्भपाताच्या अधिकाराला समाविष्ट करण्यात आले आहे. फ्रान्सच्या संसदेच्या संयुक्त सभागृहात गर्भपाताच्या अधिकाराशी संबंधित विधेयकाच्या बाजूने ७८० तर विरोधात ७२ मतं पडली. या निर्णयानंतर मध्य पॅरिसमध्ये गर्भपात हक्क कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या निर्णयाचे जल्लोषात स्वागत केले. या निर्णयानंतर फ्रान्समध्ये आयफेल टॉवर समोर महिलांनी “My Body My Choice” म्हणत सेलिब्रेशन केले.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष Emmanuel Macron यांनी आपण महिलांना गर्भपाताचा घटनात्मक अधिकार देण्याचे आश्वासन दिले होते. आता हे वचन पूर्ण झाले आहे, असे म्हणत या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले. “French pride” असा या निर्णयाचा उल्लेख करत आपण एक वैश्विक संदेश दिला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

अमेरिका आणि इतर देशांच्या तुलनेत फ्रान्समध्ये गर्भपाताच्या अधिकारांबाबत अधिक जागरूकता आहे. सर्वेक्षणानुसार, फ्रान्समधील सुमारे ८० टक्के लोकांनी गर्भपाताला कायदेशीर अधिकार देण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. फ्रान्सचे पंतप्रधान Gabriel Attal यांनी या विधेयकावर मतदान करण्यापूर्वी प्रतिक्रिया देताना, ‘आम्ही सर्व महिलांना संदेश देत आहोत की शरीर तुमचे आहे आणि त्याचे काय करायचे ते इतर कोणीही ठरवणार नाही.’

दरम्यान, फ्रान्समध्ये १९७५ पासून गर्भपात कायदेशीर आहे. परंतु मतदानानुसार सुमारे ८५ टक्के जनतेने गर्भपात अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी घटनादुरुस्तीचे समर्थन केले आहे. आधुनिक फ्रान्समधील ही २५वी घटनादुरूस्ती आहे तर २००८ नंतर ही पहिलीच घटनादुरूस्ती आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -