Sunday, May 19, 2024
HomeUncategorizedPune Ola-Uber Rates : ओला-उबरच्या मनमानी कारभाराबाबत पुणेकरांना राज्य सरकारचा दिलासा

Pune Ola-Uber Rates : ओला-उबरच्या मनमानी कारभाराबाबत पुणेकरांना राज्य सरकारचा दिलासा

सुधारित भाडेवाढ करण्यात आली बंधनकारक

पुणे : राज्यभरात ट्रक वाहतूकदारांच्या संपामुळे पेट्रोलचा तुटवडा भासता असतानाच पुणेकरांच्या नशिबी आणखी एक समस्या होती. खाजगी वाहनांसाठी पेट्रोल परवडत नाही अशी अवस्था झालेली असताना ओला-उबरसारख्या मोबाईल ॲपवर आधारीत टॅक्सीमध्ये हवे तसे भाडे आकारण्यात येत होते. मात्र, याला आता चांगलाच चाप बसणार आहे. पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणातील पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती या कार्यक्षेत्रात वातानुकुलीत टॅक्सीच्या भाडे दरात १ जानेवारीपासून सुधारणा करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली आहे.

मोबाईल ॲपवर आधारीत टॅक्सीमध्ये ओला उबेरची मक्तेदारी आणि मनमानी कारभार खपवून घेणार नाही. समाजाच्या हितासाठी लवकरच ओला आणि उबेरसारख्या टॅक्सींवरही लगाम लावणार असल्याचं राज्य सरकारनं यापूर्वी हायकोर्टात स्पष्ट केलं होतं. त्यामुळे खटुआ समितीच्या शिफारशीनुसार तसेच शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २२ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीत भाडे दरात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. काल (बुधवारी) याबाबत अधिकृत माहिती समोर आली.

इथून पुढे पुण्यात एसी कारमधून प्रवास करण्यासाठी पहिल्या दीड किलोमीटर साठी ३७ रुपये आणि पुढील प्रत्येक किलोमीटर साठी २५ रूपये मोजावे लागणार आहेत. काळी पिवळी टॅक्सीच्या दरांमधे कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. हे दर पूर्वीप्रमाणेच पहिल्या दीड किलोमीटर साठी ३१ रुपये तर पुढील प्रत्येक किलोमीटर साठी २१ रुपये याप्रमाणे असणार आहेत. याबाबतची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली आहे.

काय आहेत नवे नियम?

शहरी भागांत प्रवाश्यांची ने-आण करणाऱ्या सर्व टॅक्सी चालकांकडे वैध परवाना असणं बंधनकारक असेल. त्याचबरोबर प्रवाश्यांकडून भाडं वसूल करताना ते प्रमाणित असणं बंधनकारक आहे. त्यामुळे ओला-उबेरकडून ऐन गर्दीच्या वेळी एक आणि इतर वेळी एक अशा प्रकारे प्रवाशांकडून होणारी भाडेवसूली बंद होणार आहे. ॲपधारक टॅक्सी चालकांना त्यांच्यावर कुणाचंच बंधन नको आहे, मात्र ते शक्य नाही. कारण ओला-उबेर मोबाईल ॲपवर जरी आधारीत असल्या तरी त्या राज्य परिवहन विभागाच्या अखत्यारीत आहेत असंही राज्य सरकारने स्पष्ट केलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -