Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीRBI Action: आरबीआयची मोठी कारवाई! 'या' बॅंकेतील खातेदारांना पैसे काढण्यावर बंदी

RBI Action: आरबीआयची मोठी कारवाई! ‘या’ बॅंकेतील खातेदारांना पैसे काढण्यावर बंदी

मुंबई : आरबीआयने (RBI) नुकतीच आयडीएफसी फस्ट बँकेवर (IDFC First Bank) तसेच एलआयसी हाऊसिंग फायनान्सवरही (LIC Housing Finance) मोठी कारवाई करुन दंड ठोठावला होता. त्यानंतर आता लगेचच शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ महाराष्ट्रवर (Shirpur Merchants Co-Operative Bank ltd) देखील आरबीआयने कारवाई केली आहे. या बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोणालाही या बँकेत गुंतवणूक करता येणार नाही. तसेच पुढील सहा महिने बँकेतून पैसे काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

आरबीआयच्या कारवाईनुसार शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ महाराष्ट्र कोणतेही नवीन कर्ज देऊ शकणार नाही किंवा कोणतीही गुंतवणूक करू शकणार नाही. दरम्यान, या बँकेत पैसे जमा केलेले ग्राहक विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) अंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर दावा करु शकतात. ज्या ग्राहकांच्या खात्यात ५लाख रुपयापर्यंत रक्कम आहे, त्यांना संपूर्ण पैसे मिळू शकतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -