Tuesday, May 14, 2024
Homeक्रीडाRanji Trophy 2023-24:मुंबईने ४८व्यांदा रणजी ट्रॉफीच्या फायनमध्ये मिळवले स्थान, सेमीफायनलमध्ये तामिळनाडूवर मात

Ranji Trophy 2023-24:मुंबईने ४८व्यांदा रणजी ट्रॉफीच्या फायनमध्ये मिळवले स्थान, सेमीफायनलमध्ये तामिळनाडूवर मात

मुंबई: मुंबईच्या संघाने रणजी ट्रॉफी २०२३-२४च्या(ranji trophy 2023-24) फायनलमध्ये स्थान मिळवले आहे. मुंबईने तब्बल ४८व्यांदा रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये आपली जागा पक्की केली. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मुंबईने सेमीफायनलमध्ये तामिळनाडूला एक डाव आणि ७० धावांनी हरवले.

या रणजीच्या हंगामात मुंबईच्या रूपाने पहिला फायनालिस्ट मिळाला आहे. मुंबई ग्रुप स्टेजमध्ये ७ पैकी ५ सामने जिंकले. याशिवाय त्यांनी एक सामना गमावला आणि एक सामना अनिर्णीत ठरला.

रहाणेच्या नेतृत्वा मुंबईने बिहारला एक डाव आणि ५१ धावांनी हरवत स्पर्धेची शानदार सुरूवात केली होती. यानंतर त्यांनी ग्रुप स्टेजचा दुसरा सामना आंध्र प्रदेशविरुद्ध १० विकेटनी जिंकला. यानंतर त्यांनी तिसऱ्या सामन्यात केरळला २३२ धावांनी हरवले. दरम्यान, त्यांना चौथ्या सामन्यात उत्तर प्रदेशकडून पराभव सहन करावा लागला होता.

पाचव्या सामन्यात त्यांनी बंगालला एक डाव आणि ४ धावांनी हरवले. त्यानंतर छत्तीसगडविरुद्ध खेळवलेला सहावा सामना अनिर्णीत राहिला. यानंतर मुंबईने ग्रुपमधील सातवा आणि शेवटचा सामना आसामविरुद्ध एक डाव आणि ८० धावांनी जिंकला.

क्वार्टरफायनलमध्ये त्यांनी बडोद्याविरुद्धचा सामना अनिर्णीत राहिला. मात्र पहिल्या डावात आघाडी घेणाऱ्या मुंबईने सेमीफायनलसाठी क्वालिफाय आहे. यानंतर सेमीफायनलमध्ये त्यांनी तामिळनाडूला सेमीफायनलमध्ये हरवते फायनलचे तिकीट मिळवले.

गेल्या हंगामात सौराष्ट्रने मारली होती बाजी

याआधी रणजी ट्रॉफी २०२२-२३च्या हंगामात सौराष्ट्र संघाने बाजी मारली होती. जयदेव उनादकटच्या नेतृत्वात सौराष्ट्रने मनोज तिवारीच्या नेतृत्वातील बंगालच्या संघाला ९ विकेटनी हरवले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -