Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीRaj Thackeray : भारतीय रेल्वे मंत्रालयात मराठी तरुण तरुणींना नोकरी मिळवून देण्यासाठी...

Raj Thackeray : भारतीय रेल्वे मंत्रालयात मराठी तरुण तरुणींना नोकरी मिळवून देण्यासाठी राज ठाकरे तत्पर

मनसैनिकांना केले ‘हे’ आवाहन

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) मराठी लोकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी कायम आग्रही असतात. नुकतीच केंद्र सरकारने (Central government) रेल्वे भरती (Railway recruitment) जाहीर केली आहे. अनेक पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. यात जास्तीत जास्त मराठी तरुण तरुणींना जागा मिळाव्यात, यासाठी राज ठाकरे यांनी एक्स अकाऊंटवरुन पोस्ट करत मनसैनिकांना आवाहन केले आहे. ‘मराठी तरुण तरुणींना नोकरी मिळवून देण्यासाठी तत्पर राहा’, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

भारतीय रेल्वे विभाग ‘सहाय्यक लोको पायलट’च्या विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. एकूण ५६९६ जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय रेल्वे लोको पायलट भारती २०२४साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. यासाठी भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून वृत्तपत्राद्वारे जाहिराती देखील देण्यात आल्या आहेत. यासाठी राज ठाकरे या भरतीसाठी तरुणांना मार्गदर्शन आणि सहकार्य करण्याचे आवाहन राज्यातील मनसैनिकांना केले आहे.

राज ठाकरे यांची एक्स पोस्ट काय?

राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाची एक जाहिरात आली आहे. सहाय्यक लोको पायलटच्या ५६९६ जागा आहेत. १८ ते ३० वयाची मर्यादा आहे. अधिक तपशील ह्या जाहिरातीत दिलेल्या वेबसाईटवर मिळेल. तो जरूर पहावा. ह्यामध्ये जास्तीत जास्त मराठी तरूण-तरूणींना रोजगार मिळेल हे पहावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रोजगार आणि स्वयं-रोजगार विभाग ह्यासाठी तत्पर आहेच.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी नुसतंच “बघा वेबसाईट” असं म्हणून चालणार नाही. शाखा-शाखांवर, संपर्क कार्यालयांत, गडांवर ह्याचा रितसर तपशील लावावा. ह्याविषयातल्या तज्ञ मंडळींना ही जाहिरात दाखवून व्यवस्थित सूचना तयार कराव्यात. त्या आपल्या कार्यालयांत लावाव्यात. वाटल्यास हा अर्ज कसा भरायचा, मुलाखत कशी द्यायची ह्याचंही पूर्ण मार्गदर्शन करावं. जास्तीत-जास्त मराठी तरूण ह्यात नोकरी कशी मिळवेल ह्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं गेलं पाहिजे, असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट IndianRailways.gov.in ला भेट द्यावी. उमेदवारांनी होमपेजवरील लोको पायलट भरतीसंबंधित लिंकवर क्लिक करून अर्ज करावा, असं राज ठाकरे यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -