Sunday, May 12, 2024
Homeब्रेकिंग न्यूजRahul Narvekar : राहुल नार्वेकर लोकसभेच्या मैदानात!

Rahul Narvekar : राहुल नार्वेकर लोकसभेच्या मैदानात!

आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात करणार प्रचारास प्रारंभ

कसा असणार नार्वेकरांचा वरळीतील दौरा?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) दृष्टीने सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. त्यात भाजपाचा (BJP) प्रभाव अधिक असल्याचे सध्याचे चित्र आहे. मात्र, ज्या जागांमध्ये भाजपाचा प्रभाव कमी आहे, अशा ठिकाणी विशेष लक्ष देण्यास भाजपाने सुरुवात केली आहे. त्यात दक्षिण मुंबईचा (South Mumbai) समावेश आहे. विशेष म्हणजे दक्षिण मुंबईतून लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी पक्षाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना आदेश देण्यात आले आहेत. राहुल नार्वेकर हे लोकसभा निवडणुकीचा नारळ आदित्य ठाकरेंच्या (Aaditya Thackeray) बालेकिल्ल्यात म्हणजेच वरळीत फोडणार आहेत.

उच्चभ्रू, मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टी अशा तिन्ही प्रकारातील मतदारांचा राहुल नार्वेकर यांना अनुभव आहे. कोकणी आणि मराठी चेहरा असल्याने त्यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे. सध्या ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. अरविंद सावंतांविरोधात आता नार्वेकर मैदानात उतरणार आहेत.

दरम्यान, राहुल नार्वेकर यांच्याकडून लोकसभा मतदारसंघाची बांधणी सुरु आहे. ते आजच प्रचाराला सुरुवात करणार आहेत. आज नार्वेकर यांचा वरळी विधानसभेत दोन दिवसीय वार्ड निहाय दौरा नियोजित आहे. ते वरळीत आज सकाळी ११ वाजता वॉर्ड क्रमांक १९३ ला भेट देणार आहेत. त्यानंतर सकाळी ११:४० वाजता वॉर्ड क्रमांक १९६ कार्यालयास भेट देणार आहेत. दुपारी १२:२० वाजता वॉर्ड क्रमांक १९५ ला नार्वेकर यांची भेट असेल. याशिवाय ते स्थानिक नागरिकांसोबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर वॉर्डातील भाजपच्या प्रमुख पदाधिकांऱ्यांसोबत ते संवाद साधतील.

दक्षिण मुंबईसाठी भाजपची कशी आहे रणनीती?

लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाकडे असलेल्या वरळी आणि शिवडी विधानसभा मतदारसंघाकडे भाजपने विशेष भर दिला आहे. ठाकरे गटाची मते वळवण्यासाठी भाजप मराठीचा मुद्दा घेऊन चालणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेची देखील साथ घेण्याची शक्यता आहे. तशा प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मनसेच्या साथीने मराठी मते स्वतःकडे वळवण्यास भाजपला मदत होईल. माझगाव, शिवडी, लालबाग परळ या ठिकाणी मनसेची असलेली ताकद जमेची बाजू आहे. बाळा नांदगावकर यांचा मराठी भागात असलेला प्रभाव याचीही भाजपला मदत होऊ शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -