Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीRahul Narvekar : तेच तेच प्रश्न विचारल्याने अध्यक्ष भडकले!

Rahul Narvekar : तेच तेच प्रश्न विचारल्याने अध्यक्ष भडकले!

राहुल शेवाळेंच्या उलट तपासणी दरम्यान विधानसभा अध्यक्ष ठाकरेंच्या वकिलांवर संतापले!

मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीत आज शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांची साक्ष सुरू आहे. सुरूवातीला शेवाळेंना शिंदे गटाचे वकील साखरेंनी सवाल विचारले. त्यानंतर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत शेवाळेंची उलट तपासणी घेत आहेत. शिवसेना कार्यकारिणी बैठकीवरून शेवाळेंना सवाल विचारले जात आहेत. दरम्यान विधानसभा अध्यक्ष ठाकरे गटाच्या वकिलांमध्ये सुनावणी दरम्यान नाराज झाले. वारंवार तेच तेच प्रश्न विचारून वेळ घालवू नका, ज्या प्रश्नांची उत्तरं मागे देण्यात आली आहेत. तेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारू नका, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी वकिलांना सांगितले.

देवदत्त कामत आणि खासदार शेवाळे यांच्यातील प्रश्नोत्तरे

कामत – आपण आता जी साक्ष दिली त्या संदर्भात तुम्ही २५ नोव्हेंबर २०२३ ला जे शपथ पत्र सादर केले त्यात उल्लेख का नाही केला?

शेवाळे- जे प्रश्न विचारले गेले त्याचे उत्तर मी दिली

कामत – तुम्ही सही करण्यापूर्वी तुमचे प्रतिज्ञा पत्र वाचले आहे का हे ११ नोव्हेंबर २०२३ ला सादर केले?

शेवाळे – हो

कामत – तुम्ही त्या दिवशी कुठे होता?

शेवाळे- मुंबई

कामत – तुम्ही शपथ पत्रामद्धे मांडल्याप्रमाणे शिवसेना विधिमंडळ पक्षाचे सदस्य आहेत का?

शेवाळे- हो, मी शिवसेना पक्षाचा लोकसभेत निवडून आलेला खासदार आहे

कामत – शिवसेना विधिमंडळ पक्षाला संसदेत शिवसेना पारलीमेंट्री पक्ष म्हणतात का?

शेवाळे – हो

कामत – तुम्ही कधी उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय कार्यकारणी बैठक बोलवावी अशी विनंती केली का?

शेवाळे- हो, अनेकदा

कामत -लिखित स्वरूपात केली का?

शेवाळे- नाही

कामत – कोणत्या अधिकाराने तुम्ही ही विनंती उद्धव ठाकरे यांना केली?

शेवाळे- लोकसभा सदस्य

कामत – उद्धव ठाकरेकडे असलेल्या अधिकाराने यांना तुम्ही विनंती बैठकीसाठी करत होतात?

शेवाळे- सर्व लोकसभा सदस्य विनंती करत होते म्हणून मी विनंती बैठकीसाठी केली.

कामत – सर्व शिवसैनिक सुद्धा या संदर्भात विनंती करत होते?

शेवाळे – ते कोणाला भेटतच नव्हते आणि सेनेमध्ये अशी कुठलीही प्रक्रिया नाही.

कामत – परिशिष्ट 5 मध्ये म्हटल्याप्रमाणे लोकसभेचा सदस्य राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीसाठी विनंती करत होता?

शेवाळे – हो

कामत – अशी कोणत्या पदावर असलेली व्यक्ती राष्ट्रीय कार्यकारणी बैठक बोलवावी अशी विनंती करत होते?

शेवाळे- नेते गजानन कीर्तिकर

कामत – सर्व शिवसेना आमदार,नेते, उपनेते, नगरसेवक, कार्यकर्ते आणि शिवसैनिक हे सुद्धा राष्ट्रीय कार्यकारणीसाठी आग्रही होते.

शेवाळे- उद्धव ठाकरे हे यापैकी कोणालाच भेटत नव्हते. हे सर्व जण मविआमधील भ्रष्टाचारामुळे त्रस्त होते. म्हणून त्यांना ती बैठक हवी होती. परंतु उद्धव ठाकरे यांनी त्यांना कधीच भेटण्यासाठी वेळ दिली नाही.

कामत – उद्धव ठाकरे यांना या सर्वांनी राष्ट्रीय कार्यकारणी बैठक बोलवावी यासाठी विनंती केली होती की नाही?

शेवाळे- ते भेटायला वेळच देत नव्हते.

कामत – उद्धव ठाकरे यांनीच ती राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक का बोलवायची?

शेवाळे- ही परंपरा राहिली आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ती परंपरा राहिली आहे.

कामत – किती वर्षापासून ही प्रथा शिवसेना पक्षात राहिली आहे?

शेवाळे – याची मला कल्पना नाही.

कामत – २०१० नंतर ही प्रथा सुरू झाली.

शेवाळे – मला माहित नाही.

कामत – ज्याप्रकारे आधी उत्तर दिलाय त्यानुसार ही प्रथा बाळासाहेब ठाकरे हयात असताना सुद्धा ही प्रथा चालू आहे?

शेवाळे- बाळासाहेब ठाकरे असताना ही प्रथा सुरू करण्यात आली. १९९८ ला घटनेत बदल केल्यानंतर कुठल्याही प्रथा प्रक्रिया फॉलो केल्या नाहीत.

कामत- याचा अर्थ १९९८ नंतर बाळासाहेब ठाकरे यांनी या संदर्भत कुठलीही प्रोसिजर फॉलो केल्या नाहीत?

शेवाळे- मी असं कुठेही बोललो नाही की बाळासाहेब ठाकरे यांनी १९९८ नंतर कुठलीही प्रोजीसर फॉलो केली नाही.

कामत – तुम्ही आधी ज्या प्रकारे उत्तर दिले त्यानुसार आपल्याला असे म्हणायचं होत का? की बाळासाहेब ठाकरे हयात असताना पासून उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय कार्यकारणी बोलवायची अशी प्रथा होती का?

शेवाळे – नाही.

कामत – असे का होत की उद्धव ठाकरे यांनीच राष्ट्रीय कार्यकारणी बैठक बोलवायची?

शेवाळे- यापूर्वी सर्व त्यांनाच विनंती करत होते म्हणून

कामत – यापूवी म्हणजे नेमकं कधी?

शेवाळे- माहीत नाही

कामत – सर्वजण विनंती करायचे म्हणजे कोण?

शेवाळे- ज्यांना बोलायचे होते ते

कामत- म्हणजे पक्षातील प्रत्येक जण उद्धव ठाकरे यांना विनंती करायचे

शेवाळे- नाही

कामत – कोणत्या उद्धव ठाकरे यांच्याकडे असे कोणते अधिकार होते त्यामुके सर्वजण राष्ट्रीय कार्यकारणी बोलवण्यासंदर्भात विनंती त्यांना करायचे?

अध्यक्ष – हा प्रश्न या आधी झाला आहे… ज्यामध्ये सर्वजण त्यांना विनंती करायचे असे उत्तर दिलं आहे त्यांनी.

कामत – उद्धव ठाकरे हे पक्ष प्रमुख होते त्यामुळे त्यांना सर्वजण बैठकीसाठी विनंती करायचे?

शेवाळे- माहीत नाही

कामत – एका न्यायालयीन खटल्याच्या याचिकेत आपण उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख म्हणून उल्लेख केला आहे.

शेवाळे – हो

कामत – उद्धव ठाकरे हे नियमित राष्ट्रीय कार्यकारणी आणि प्रतिनिधी सभा बोलवत असत?

शेवाळे – नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -