पुणे शहरात पालिका उभारणार 500 ठिकाणी चार्जिंग स्टेशन

Share

पुणे:  पर्यावरणपूरक वाहनांचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी महापालिका शहरातील प्रमुख रस्ते, उद्याने, महाविद्यालये अशा मोक्याच्या 500 ठिकाणी चार्जिंग स्टेशन आणि 200 ठिकाणी डॉकिंग स्टेशन्स उभारणार आहे. त्यासाठी महापालिकेने निविदा मागविली आहे.

‘ई-बाईक रेटिंग’ या उपक्रमांतर्गत नागरिकांना कमीत कमी दरामध्ये भाडेतत्त्वावर ई- बाईक उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या उपक्रमासाठी निवडल्या जाणाऱ्या कंपनीला मिळणाऱ्या उत्पन्नातही महापालिकेला वाटा मिळणार असून असा उपक्रम राबविणारे पुणे हे देशातील पहिले शहर असेल. पर्यावरणपूरक वाहनांचा वापर वाढवून प्रदूषण कमी करण्यासाठी राज्य शासनाने दिलेल्या गाइडलाइन्सनुसारच ही निविदा मागविण्यात आली आहे.

त्यानुसार 500 चौ. कि.मी. च्या शहरात ई-बाईकचे चार्जिंग स्टेशन आणि डॉकिंग स्टेशनसाठी मोक्याच्या 700 जागा निवडण्यात आल्या आहेत. नागरिकांना सहजासहजी ई-बाईक उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सरासरी प्रत्येक चौरस कि. मी. च्या परिसरात एक चार्जिंग स्टेशन असेल.

Recent Posts

गुंतवणुकदारांसाठी खुशखबर, NSE देणार एका शेअरवर चार बोनस शेअर!

NSE: नॅशनल स्टॉक एक्सचेंज पात्र गुंतवणुकदारांच्या एका शेअरवर चार बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे.…

22 mins ago

मनसे नेते अविनाश जाधवांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल…

मनसे नेते अविनाश जाधव यांनी झवेरी बाजारातील सराफा व्यापाऱ्याच्या मुलाला धमकावत पाच कोटी रुपयांची खंडणी…

1 hour ago

सरकारने हटवली कांदावरील निर्यात बंदी, बळीराजा सुखावला…

Onion Export: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने कांद्याच्या निर्यात धोरणात 'निषिद्ध' वरून 'मोफत' मध्ये सुधारणा…

2 hours ago

Prakash Ambedkar : काँग्रेसचा न्यायाशी संबंध नाही!

काँग्रेस आणि तिची जातीय वर्चस्ववादी वृत्ती खाली आणा आधी आघाडीची बोलणी झालेल्या काँग्रेसविषयी प्रकाश आंबेडकर…

3 hours ago

Amitabh Bachchan : ‘बिग बी’कडून कोस्टल रोड आणि शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुक!

देवेंद्र फडणवीस यांनी फिल्मी स्टाईल मानले अमिताभ यांचे आभार मुंबई : बहुचर्चित असलेल्या मुंबई कोस्टल…

4 hours ago