ठाण्यात उद्यापासून मनाई आदेश लागू

Share

ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी मनाई आदेश लागू केले आहेत. हे मनाई आदेश १० जानेवारी रोजी १ वाजेपासून २४ जानेवारी रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अंमलात राहतील.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत राजमाता जिजाऊ भोसले जयंती, स्वामी विवेकानंद जयंती, १४ जानेवारी रोजी मकर संक्राती, नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती, बाळासाहेब ठाकरे जयंती होणार आहेत. त्या आनुषंगाने मनाई आदेश लागू केले आहेत.

यामध्ये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंड, बंदुका, लाठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, बाळणणे, जमा करणे व तयार करणे, दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे. कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ आणि द्रव बाळगणे, सार्वजनिक घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादीचा समावेश आहे.
या दरम्यान कोणत्याही इसमाचे चित्र किंवा पुढाऱ्यांच्या चित्र, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे. सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्यातील शांतता धोक्यात येईल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे, पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे आदींचा यामध्ये समावेश राहणार आहे.

जे सरकारी नोकर आहेत किंवा ज्यांस वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने सूट दिलेली आहे, त्यांना सदर मनाई आदेश लागू राहणार नाहीत.
दरम्यान लग्न, प्रेत यात्रा, कोर्ट, सरकारी, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय, पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा, मिरवणुका. सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण, या ठिकाणी हे आदेश लागू राहणार नाहीत.
मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे ठाणे शहर पोलीस आयुक्त, जयजीत सिंह यांनी कळविले आहे.

Tags: police

Recent Posts

Hindu temples : मुंबईतील प्राचीन मंदिर बाबुलनाथ

कोकणी बाणा : सतीश पाटणकर मुंबई शहरात अनेक पर्यटन स्थळे, प्राचीन, प्रसिद्ध मंदिरांचा वारसा लाभला…

6 hours ago

प्रेमकहाणी भाग-१

नक्षत्रांचे देणे : डॉ. विजया वाड प्रेमकहाणी या लेखामधून दोन प्रेमी जीवांची झालेली ताटातूट, तरी…

6 hours ago

Drought : डोळे उघड माणसा…

विशेष : लता गुठे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडे आणि त्यांच्या एकमेकांमध्ये गेलेल्या फांद्या यामुळे…

6 hours ago

Mahabharat : महाभारत युद्धातील जेवण व्यवस्थेचे रहस्य

विशेष : भालचंद्र ठोंबरे महाभारतात कौरव पांडवांचे युद्ध होणार, हे निश्चित झाल्यावर, देशोदेशीच्या राजांनाही या…

6 hours ago

साठवण…

विशेष : नीता कुलकर्णी गोष्ट आहे तुमच्या माझ्या आईची... आमच्या परीक्षा झाल्या की, आई वर्षभराच्या…

6 hours ago

Nostalgic song : हसता हुवा नुरानी चेहरा…

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे बाबुभाई मिस्त्री यांनी दिग्दर्शित केलेला ‘पारसमणी’(१९६३) ही एक छोटी संगीत मेजवानी…

7 hours ago