Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ३० नोव्हेंबर रोजी घेणार शनीदेवाचे दर्शन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ३० नोव्हेंबर रोजी घेणार शनीदेवाचे दर्शन

शनिशिंगणापुरात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक

शनिशिंगणापूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा ३० नोव्हेंबर रोजी शनिशिंगणापूर दौरा निश्चित झाला असून जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनीदेवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात नियोजन व आवश्यक उपाययोजनकरिता आढावा घेतला. राष्ट्रपती उदासी महाराज मठात अभिषेक व शनिमूर्तीस तेल अभिषेक करून दर्शन घेणार आहेत. येथे त्या भोजनालयातील महाप्रसाद घेणार असल्याने या दौऱ्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

राहुरी कृषी विद्यापीठ व सोनई येथील दोन हेलिपॅडची प्रशासनाने पाहणी केली. यावेळी देवस्थान व अन्य विभागास आवश्यक सूचना देण्यात आल्या. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय बिरादार, देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, सहायक कार्यकारी अधिकारी नितीन शेटे उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -