नेपाळमध्ये राजकीय संकट

Share

पंतप्रधानांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण

काठमांडू (वृत्तसंस्था) : पाकिस्तान, श्रीलंकेप्रमाणे नेपाळमध्ये राजकीय संकट निर्माण झाले आहे. नेपाळमधील राजकीय अस्थिरता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. शेर बहादूर देऊबा यांच्या सरकारच्या गैरकारभारामुळे विरोधी पक्षनेते के. पी. ओली शर्मा यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षांच्या भूमिकेला नेपाळच्या सत्ताधारी पक्ष नेपाळी काँग्रेसनेही समर्थन देत पंतप्रधानांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. के. पी. शर्मा ओली यांनी देशातील आघाडी सरकारने विश्वास गमावला असून त्यांचे सत्तेत राहण देशासाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे.

शेर बाहदूर देऊबा यांनी गेल्या वर्षी १३ जुलै रोजी सरकार स्थापन केले होते. देऊबा सरकारमध्ये जनार्दन शर्मा यांना अर्थमंत्रिपद देण्यात आले होते. अर्थसंकल्प लीक केल्याचा आरोप झाल्याने शर्मा यांना पदावरुन हटवण्यात आले होते. शर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधानांनी अर्थमंत्रिपद स्वत: कडे ठेवले होते. देऊबा सरकार संविधानात बदल करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याला के पी शर्मा ओलींनी विरोध केला होता.

काठमांडू पोस्टच्या बातमीनुसार के पी शर्मा ओली यांनी शेर बहादूर देऊबा सरकारने विश्वास गमावला आहे. देशात अशाच घटना सुरु राहिल्यातर नेपाळमध्ये श्रीलंकेची पुनरावृत्ती होऊ शकते, असे ओली म्हणाले. अर्थसंकल्प बनवण्याच्या प्रक्रियेत उद्योजक प्रतिनिधींना सहभागी करुन घेण्यात आले आहे. देशात शस्त्र खरेदी सुरु असल्याची माहिती आहे. या घटनाक्रमामुळे सरकारला काही घटकांचे समर्थन असू शकते, आपण सावध राहिले पाहिजे, असे केपी शर्मा ओली यांनी म्हटले आहे.

शेर बहादूर देऊबा यांच्या पक्षातही त्यांच्या कारभाराबद्दल असंतोष निर्माण झाला आहे. शेखर कोयराला यांनी संविधानात, बदल करण्याच्या धोरणाबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. शेखर कोयराला यांनी नेपाळी काँग्रेसने डाव्या पक्षांशी आघाडी करुन पक्षाच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम देऊबा यांचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला. कोयराला समर्थकांनी देऊबा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

Recent Posts

DC vs RR: सॅमसंगचा वादग्रस्त झेल, दिल्लीसमोर राजस्थान फेल…

DC vs RR: दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगलेला सामना दिल्लीसाठी खूपच महत्त्वाचा आहे.…

7 hours ago

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात शांततेत मतदान

महायुतीच्या कार्यकर्त्यांत कमालीचा उत्साह सिंधुदुर्ग : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात…

8 hours ago

देशात तिसऱ्या टप्प्यात ६१ टक्के तर महाराष्ट्रात ५४.०९ टक्के मतदान

मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडले. यामध्ये १२ राज्ये आणि…

8 hours ago

कडिपत्ता खाण्याने दूर होतात हे आजार

मुंबई: कडिपत्त्याचे सेवन खाण्यापासून ते अनेक औषधांमध्ये केला जातो. यातील अनेक औषधीय गुण अनेक आजारांमध्ये…

9 hours ago

काँग्रेसकडून कसाबचे समर्थंन हे देशासाठी धोकादायक

पंतप्रधान नरेंद्र मोदींने ओढले काँग्रेसच्या पाकिस्तानधार्जिण्या भूमिकेवर आसूड नगर : मुंबईवर झालेल्या २६/११ सागरी हल्ला…

9 hours ago

मतांच्या लाचारीमुळे उद्धव ठाकरे बसले गप्प; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

मुंबई : पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या वडेट्टीवार यांच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? असा सवाल आता…

10 hours ago