Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीराज्यात १८ हजार पोलीस पदे भरणार; पोलीस ठाणे वाढणार!

राज्यात १८ हजार पोलीस पदे भरणार; पोलीस ठाणे वाढणार!

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा

मुंबई : राज्यात आगामी वर्षभरात १८ हजार ५५२ पोलिसांची पदं निर्माण होणार आहेत, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. विधानसभेत विरोधकांनी २९३ अंतर्गत उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना फडणवीस बोलत होते.

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. कायदा सुव्यवस्था ढासळली आहे बाबत विरोधकांनी २९३ अंतर्गत कायदा सुव्यवस्थेवर चर्चा करण्याची विनंती केली होती. यावेळी विरोधकांनी राज्यातले अनेक विषय समोर आणले होते. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले , “राज्यात पोलीस दलाचा नवा आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. ६० वर्षात आज पर्यंत १९६० चा आकृतीबंध होता. लोकसंख्या वाढली तरी १९६० च्या लोकसंखेनुसार पोलीस स्टेशन आणि पोलिसांची संख्या होती. हे पाहता पोलीस स्टेशन वाढवणं, पद वाढवणे याबाबतचा अहवाल तयार करण्यात आला. हा अहवाल सरकार ने मान्य ही केला आहे. या अहवालानुसार किती लोकसंखेमागे एक पोलीस स्टेशन असेल? किती लोकांच्या मागे एक पोलीस असेल? हे निश्चित करण्यात आले आहे. यानुसार राज्यात १८ हजार पोलीस आणि अधिकारी लागणार असल्याचाी माहिती फडणवीसांनी दिली.

पुणे शहरात पोलिसांची संख्या कमी झाली म्हणून शासनाने कंत्राटी पोलीस घेतले आहेत. हे कर्मचारी सरकारच्याच महाराष्ट्र सुरक्षा मंडळाकडून घेण्यात आले आहेत. ही भरती कुठल्याही खाजगी ठेकेदारांकडून होणार नसल्याचे देखील देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले. राज्यात पोलिसांची संख्या कमी असली तरी क्वीक रिस्पॉन्स टाईम ( गुन्हा घडल्यानंतर पोलीस दाखल होण्याची वेळ) आठ मिनिटांवरून चार मिनिटांवर आली आहे. ही राज्यासाठी समाधानकारक बाब असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -