Sunday, May 12, 2024
Homeताज्या घडामोडीState Fish of Maharashtra : 'पापलेट' महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून घोषित

State Fish of Maharashtra : ‘पापलेट’ महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून घोषित

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईत झालेल्या राष्ट्रीय परिषदेत केली घोषणा

मुंबई : आजपासून ‘सिल्वर पापलेट’ (silver pofret) हा महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून ओळखला जाईल अशी माहिती आज मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. सातपाटीमधील मच्छीमार सहकारी संस्थांनी याबाबत सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्याबद्दल मागणी केली होती. ती आता पूर्ण झाली आहे.

‘पापलेट’ (pofret) हा मासा परकीय चलन मिळवून देणारा आहे. त्यामुळे चवीसोबतच आर्थिक दृष्ट्यादेखील त्याचे विशेष मह्त्त्व आहे.

‘सिल्वर पापलेट’ महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून यापुढे ओळखला जाईल अशी घोषणा आज मुंबईतील मस्त्यपालन, पशुपालन तथा डेयरी क्षेत्रातील किसान क्रेडिट कार्ड या विषयासंदर्भातील राष्ट्रीय परिषदेत करताना अतिशय आनंद झाला, असे ट्विट सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

‘पापलेट’ला महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून घोषित केल्याने या अधिकृत मत्स्य प्रजातीच्या अधिवासाचे संरक्षण करण्यासोबतच सागरी पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -