Sunday, May 19, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखNarendra Modi : पीएम सूर्य घर मोफत वीज योजना

Narendra Modi : पीएम सूर्य घर मोफत वीज योजना

  • एस. काने/आर. अगाशे/पी. कोर

प्रतिकुटुंब १५ हजार रुपयांची बचत करणारी एक परिवर्तनकारी योजना अर्ज करण्याची आणि रूफटॉप सोलर योजनेअंतर्गत अनुदान मिळविण्याची प्रक्रिया पीएम सूर्य घर मुफ्त बिजली (मोफत वीज) योजना काय आहे?, तर पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना ही केंद्र सरकारची योजना असून, आपल्या घराच्या छतावर सौर ऊर्जा संच बसविण्याचा निर्णय घेणाऱ्या भारतातील एक कोटी कुटुंबांना मोफत वीज उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. यामध्ये संबंधित कुटुंबांना दरमहा ३०० युनिट मोफत वीज उपलब्ध होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने २९ फेब्रुवारी रोजी मंजूर केलेली ही एक महत्त्वाकांक्षी योजना असून, यासाठी ७५,०२१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना कशी काम करते?

या योजनेअंतर्गत २ किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या संचासाठी सौर युनिट खर्चाच्या ६०% आणि २ ते ३ किलोवॅट दरम्यान क्षमतेच्या संचासाठी अतिरिक्त प्रणाली खर्चाच्या ४० टक्के अनुदानाची तरतूद आहे. अनुदानाची मर्यादा ३ किलोवॅट क्षमतेपर्यंत ठेवण्यात आली आहे. म्हणजेच, सध्याच्या सर्वोत्तम किमतींनुसार १ किलोवॅट क्षमतेच्या संचासाठी ३०,००० रुपये अनुदान, २ किलोवॅट क्षमतेच्या संचासाठी ६०,००० रुपये आणि ३ किलोवॅट किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या प्रणालीसाठी ७८,००० रुपये अनुदान मिळेल.

या योजनेसाठी अर्ज करायला कोण असणार पात्र?

१. अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. २. सौर पॅनेल बसविण्यासाठी योग्य छप्पर असलेले घर असणे आवश्यक आहे. ३. कुटुंबाकडे वैध वीज जोडणी असणे आवश्यक आहे. ४. सौर
पॅनेलसाठी कुटुंबाने इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजनेसाठी अर्ज कसा करावा?

सर्वप्रथम, इच्छुक ग्राहकाला www.pmsuryaghar.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. आपले राज्य आणि वीज वितरण कंपनीची निवड करून त्यानंतर हे करावे लागेल. राष्ट्रीय पोर्टल, संबंधित कुटुंबांना सौर संचाचा योग्य आकार, फायदे मोजणारी यंत्रणा,
विक्रेता क्रमवारी इ. सारखी संबंधित माहिती प्रदान करून मदत करेल. ग्राहकांना विक्रेत्याची आणि आपल्या घराच्या छतावर बसविण्यासाठी विशिष्ट बनावटीच्या सौर ऊर्जा संचाची निवड करता येईल.

सौर ऊर्जा संचासाठी ग्राहक कर्ज सुविधेचा लाभ घेऊ शकतो का?

होय. ३ किलोवॅटपर्यंतची निवासी आरटीएस प्रणाली बसविण्यासाठी कुटुंबांना सध्या सुमारे ७% तारणमुक्त कमी व्याजाचे कर्ज मिळविता येईल. भारतीय रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी ठरवलेल्या प्रचलित रेपो दरापेक्षा ०.५% अधिक व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. रेपो दर, जो सध्या ६.५% आहे, तो ५.५% इतका कमी झाला, तर ग्राहकांसाठी प्रभावी व्याजदर सध्याच्या ७% ऐवजी ६% इतका राहील.

अनुदानाचा लाभ घेण्यासाठी प्रक्रियेच्या पायऱ्या कोणत्या?

पहिली पायरी : पोर्टलवर पुढील गोष्टींची नोंदणी करा. आपले राज्य आणि वीज वितरण कंपनी निवडा.
आपला वीज ग्राहक क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि ईमेल प्रविष्ट करा.
पायरी दुसरी : ग्राहक क्रमांक आणि मोबाइल क्रमांकासह लॉगिन करा. अर्जातील सूचनांनुसार रूफटॉप सौर ऊर्जा प्रणालीसाठी अर्ज करा.
तिसरी पायरी : व्यवहार्यता मंजुरी मिळाल्यावर, कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्याकडून आपल्या घराच्या छतावर सौर ऊर्जा संच स्थापित करा.
पायरी चौथी : •संच बसवण्याचे काम पूर्ण झाल्यावर, प्लांटबाबतचा तपशील सबमिट (जमा) करा आणि नेट मीटरसाठी अर्ज करा.
पाचवी पायरी : नेट मीटर बसविल्यानंतर आणि डिस्कॉमद्वारे तपासणी केल्यानंतर पोर्टलवरून कमिशनिंग (मंजुरी) प्रमाणपत्र तयार केले जाईल.
पायरी सहावी : कमिशनिंग अहवाल मिळाल्यावर पोर्टलच्या माध्यमातून बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करा. तुमचे अनुदान तुमच्या बँक खात्यात ३० दिवसांच्या आत जमा होईल.
रूफटॉप सोलर योजनेची निवड का करावी?

साधे अर्थशास्त्र. लाभार्थी कुटुंबे आपल्या विजेच्या बिलाची बचत करू शकतील, तसेच आपल्या जवळची अतिरिक्त वीज डिस्कॉमला विकून अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतील.

पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना ३ किलोवॅट क्षमतेचे रूफटॉप सोलर युनिट बसवून महिन्याला ३०० युनिट्सपर्यंत वीज वापरणाऱ्या कुटुंबांची वर्षाला अंदाजे १५,००० रुपयांची बचत करण्याचे आश्वासन देते. यामुळे स्वतःची वीज उत्पन्न करणाऱ्या संबंधित कुटुंबांच्या वीज बिलात सुमारे १,८०० ते १,८७५ रुपये इतकी बचत होईल.

सौर युनिटला वित्तपुरवठा करण्यासाठी घेतलेल्या कर्जावरील ६१० रुपयांचा ईएमआय (हप्ता) वजा केल्यावरही, दरमहा सुमारे १,२६५ रुपये किंवा वर्षाला अंदाजे १५,००० रुपये बचत होईल. कर्ज न घेणाऱ्या कुटुंबांची त्याहूनही अधिक बचत होईल. नवीकरणीय ऊर्जेची निवड करून, हरित गृहासाठी योगदान देण्याची ही एक उत्तम संधी आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -