Sunday, May 12, 2024
Homeताज्या घडामोडीPM Narendra Modi in Nashik : भव्य रोड शो, काळाराम मंदिर, गोदावरीची...

PM Narendra Modi in Nashik : भव्य रोड शो, काळाराम मंदिर, गोदावरीची आरती… कसा चालू आहे पंतप्रधानांचा नाशिक दौरा?

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज महाराष्ट्र दौर्‍यावर आहेत. २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या (National Youth Festival) आयोजनाची जबाबदारी यंदा महाराष्ट्रावर (Maharashtra) सोपवण्यात आली आहे. या महोत्सवाचे आयोजन नाशिकमध्ये (Nashik) होत असल्याने शहरात गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांची मांदियाळी दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील यानिमित्ताने आज नाशिक शहरात दाखल झाले.

संपूर्ण नाशिककर पंतप्रधान मोदींच्या रोड शोची (Road Show) आतुरतेने वाट पाहत होते. सकाळी १०:३० वाजता त्याचे निलगिरी बाग येथे आगमन झाले. पंतप्रधान मोदी येताच जवळपास ४० गाड्यांच्या ताफ्यासह मोदींचा भव्य रोड शो झाला. पेशवाई पथक, लेझीम, ढोल ताशांच्या गजरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करण्यात आले. यात हजारो युवक-युवतींनी सहभाग घेतला. तसेच ध्वज हातात घेऊन कला सादरीकरण करण्यात आले. पंतप्रधान मोदींवर नाशिककरांनी फुलांचा वर्षाव केला. यावेळी नागरिकांच्या ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मिरची सिग्नलपासून मोदींच्या रोड शोला सुरुवात झाली. जनार्धन स्वामी मठ चौकापर्यंत हा रोड शो करण्यात आला.

पंचवटीत प्रभू रामाचे दर्शन अन् रामकुंडावर जलपूजन

रोड शो नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या रामकुंड परिसराला भेट दिली. पुरोहित संघाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. नाशिककरांच्या वतीने चांदीचा कुंभ आणि पगडी देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. भारत विकसित राष्ट्र बनण्यासाठी यावेळी संकल्प करण्यात आला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आरती देखील करण्यात आली.

यानंतर त्यांनी ऐतिहासिक काळाराम मंदिरात दर्शन घेतले. जवळपास २३ मिनिटे त्यांनी मंदिरात विधिवत पूजा करत प्रभू श्रीरामाची महाआरती केली. मोदींनी पूर्व महाद्वाराने मंदिरात प्रवेश केला आणि प्रथम हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रधान संकल्प केला करुन भावार्थ रामायणाचा पाठ केला आणि रामरक्षा पठण केले.

अतिरिक्त अडीच हजार पोलीस नाशकात दाखल

राज्यभरातून अतिरिक्त पोलीस नाशिकला दाखल झाले आहेत. यामध्ये १३० पोलीस अधिकाऱ्यांसह दोन हजार अंमलदार व राज्य राखीव दलाच्या पाच तुकड्या (एसआरपीएफ), असा सुमारे अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा नाशिकमध्ये आहे. विविध जिल्ह्यांमधून १३ बॉम्ब शोधक-नाशक पथकांनाही पाचारण करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -