Saturday, May 18, 2024
HomeदेशPM Modi : पंतप्रधान मोदींची जयपूरमध्ये जनसभा, पहिल्यांदा महिला सांभाळणार व्यवस्था

PM Modi : पंतप्रधान मोदींची जयपूरमध्ये जनसभा, पहिल्यांदा महिला सांभाळणार व्यवस्था

नवी दिल्ली : राजस्थानात(rajasthan) या वर्षाच्याअखेरीस विधानसभा निवडणुका आहेत. यासाठी मोठमोठे राजकीय पक्ष तयारी करत आहेत. तर राजस्थान भाजपकडून परिवर्तन संकल्प यात्रा काढली जात आहे. या यात्रेच्या समाप्तीनिमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जयपूरमध्ये एक रॅली संबोधित करणार आहेत.

या दरम्यान ते मंचावर अनोख्या अंदाजात येणार आहेत. सोबतच पंतप्रधान मोदींची संपूर्ण व्यवस्था महिला सांभाळणार आहेत. केंद्रीय राज्य मंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले महिला आरक्षण विधेयकासाठी पंतप्रधान मोदींना धन्यवाद देण्यासाठी मोठ्या संख्येने महिला परिवर्तन संकल्प महासभेत सामील होणार आहेत.

मेघवाल यांनी सांगितले की रॅली स्थळावर ४२ ब्लॉक बनवण्यात आले आहेत. प्रत्येक ब्लॉकची कमान एका महिलेकडे असणार आहे. येथील व्यवस्था देखरेख महिला करणार आहेत.

मेघवाल पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदी खुल्या जीपमध्ये रॅलीमध्ये पोहोचतील. केंद्रीय मंत्री आणि राजस्थानात भाजपचे निवडणूक प्रभारी प्रल्हाद जोशी यांनी दादिया गावात रॅलीच्या अंतिम तयारीचे निरीक्षण केले.

प्रल्हाद जोशी म्हणाले आमच्या परिवर्तन संकल्प यात्रेला भारी समर्थन मिळाले आहे. त्यांनी सांगितले की पंतप्रधा मोदींच्या रॅलीसाठी राज्यभरातून लोक सोमवारी जयपुरात एकत्र होतील. पंतप्रधान जनसभा संबोधित करण्याआधी धानक्या गावात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -