पिंकी आणि शरयू उलगडताना

Share

मुंबई : मनोरंजनाच्या प्रवाहात सातत्याने नवनवे प्रयोग करणारी महाराष्ट्राची नंबर वन वहिनी नव्या वर्षात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची नवी भेट घेऊन येणार आहे. १७ जानेवारीपासून रात्री ११ वाजता स्टार प्रवाहवर सुरू होतेय नवी मालिका ‘पिंकीचा विजय असो’.

आयुष्य भरभरून जगणाऱ्या अतरंगी आणि सतरंगी पिंकीची गोष्ट या मालिकेतून उलगडेल. खाईन तर तुपाशी अश्या ठाम विचारांच्या असणाऱ्या पिंकीला फिल्मी दुनियेचं फार आकर्षण आहे. तिच्या रहाण्यातून, वागण्यातून आणि बोलण्यातून ते प्रकर्षाने जाणवतं. दुसऱ्याकडून काम करुन घेण्याचं अजब कसब पिंकीकडे आहे. तिची इंग्रजी बोलण्याची एक वेगळीच स्टाईल आहे. अशी ही स्वप्नाळू पिंकी आपली स्वप्न कशी पूर्ण करते हे मालिकेतून पाहायला मिळेल.

पिंकी आणि शरयूमध्ये अजिबात साम्य नाही. पिंकी बिनधास्त आहे. तिची अखंड बडबड सुरु असते. पिंकीच्या स्वभावाच्या पूर्ण विरोधी असा शरयूचा स्वभाव आहे. शरयू खूपच शांत आहे. त्यामुळे पिंकी साकारणं हे  नवं आव्हान आहे. पिंकीची बोलण्याची स्टाईल शरयूच्या इतकी अंगवळणी पडली आहे की शूटिंग व्यतिरिक्तही ती इतरांशी संवाद साधताना त्याच भाषेत बोलते.

सेट हे शरयूचं दुसरं घरच आहे. सहकलाकार आणि  दिग्दर्शक  खूप समजून घेतात. पिंकी हे पात्र उभं करण्यात  संपूर्ण टीमचा मोलाचा वाटा आहे. लहान भावाची भूमिका साकारणाऱ्या हर्षद नायबळसोबत शरयू सेटवर खूप धमाल करते. त्याच्यावर ताईगिरी दाखवतानाच भावाच्या मायेने प्रेमही करते. त्यामुळे नव्या वर्षाने तिला नवं कुटुंब दिलंय असंच म्हणायला हवं.

Recent Posts

Spicejet Airline : हवाई प्रवाशांची मागणी घटल्याने हैदराबाद-अयोध्या विमानसेवा ठप्प!

स्पाईसजेट कंपनीने घेतला 'हा' मोठा निर्णय नवी दिल्ली : काही महिन्यांपूर्वी स्पाईसजेटने (Spicejet) दिल्ली, मुंबई,…

1 hour ago

Durgadi fort : शिवरायांनी बांधलेला कल्याणमधील दुर्गाडी बुरुज ढासळला!

निधी न मिळाल्याने दुरुस्तीचे काम अपूर्ण राहिल्याची माहिती कल्याण : राज्यात मान्सूनचे (Monsoon) आगमन झाले…

2 hours ago

Air service : विदर्भ ते मराठवाडा एका तासात! लवकरच सुरु होणार विमानसेवा

कसं असणार वेळापत्रक? विदर्भ ते मराठवाडा (Vidarbha to Marathwada) प्रवास करणार्‍यांसाठी एक खुशखबर आहे. विदर्भ…

2 hours ago

Chhatrapati Shivaji Maharaj Bakhar : फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची अप्रकाशित बखर!

शिवरायांच्या कारकिर्दीसह नव्या पैलूंचा उलगडा होणार पॅरीस : फ्रान्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जुनी, अप्रकाशित…

2 hours ago

Yummo ice cream : कापलेलं बोट आढळलेल्या आईस्क्रिमप्रकरणी धक्कादायक माहिती समोर!

यम्मो कंपनीने घडल्या प्रकारावर दिली प्रतिक्रिया मुंबई : मुंबईच्या मालाडमधून (Mumbai crime) ऑनलाईन ऑर्डरप्रकरणी (Online…

3 hours ago

Pandharpur News : ज्ञानोबा-तुकोबांकडे जाणारा पालखी मार्ग खचला!

प्रशासनाच्या कामाबाबत वारकऱ्यांचा असंतोष सोलापूर : आषाढी एकादशीनिमनित्त संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी…

3 hours ago