शरद पवार आणि बृजभूषण सिंहांचा एकत्र फोटो; मनसेचा पवारांकडे निशाणा

Share

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा एकत्र फोटो व्हायरल करून मनसेने शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केल्यानंतर भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी या दौऱ्याला विरोध केला होता.

या पाश्वभूमीवर राज ठाकरेंनी हा दौरा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. याचबाबत राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत असे म्हटले होते की, माझ्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली. असं असताना आता मनसेकडून आज एक नवा फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये बृजभूषण सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे एका कार्यक्रमात एकत्र दिसत आहेत. हाच फोटो शेअर करून मनसेने पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

मनसे नेते गजानन काळे यांनी या फोटो ट्वीट केला असून यावेळी कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की, “ब्रिज”चे निर्माते… सुज्ञास अधिक सांगणे न लगे… त्यामुळे राज ठाकरे यांनी जो आरोप केला होता की, महाराष्ट्रतून रसद पुरविली गेली त्याविषयी आता थेट शरद पवारांवर मनसेकडून आरोप केला जात आहे.

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

8 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

9 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

9 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

10 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

10 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

10 hours ago