Wednesday, May 22, 2024
Homeदेशमोदींना विरोध करणाऱ्यांना जनता जमालगोटा देणार

मोदींना विरोध करणाऱ्यांना जनता जमालगोटा देणार

एकनाथ शिंदे यांनी नवीन संसद भवनाला विरोध करणाऱ्यांना दिली चपराक

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यशस्वी कामगिरी पाहून पोटदूखी होणाऱ्या लोकांना जनता जमालगोटा देणार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन संसद भवनाला विरोध करणाऱ्या विरोधकांना चपराक दिली आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त झालेल्या सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, तसेच भाजप व शिवसेनेचे खासदार उपस्थित होते.

ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचे औचित्य साधून नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाचे उद्घाटन केले आहे. अत्यंत रेकॉर्डब्रेक वेळेत संसदेचे काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण देशवासियांना अभिमान वाटेल अशी ही वास्तू असून यामुळे लोकशाही अधिक बळकट आणि वृद्धींगत होणार आहे. देशाला ११ व्या क्रमांकावरुन ५ व्या क्रमांकावर नेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीला पाहुन पोटदुखी होणाऱ्या लोकांना जनता जमालगोटा देणार आहे असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती महाराष्ट्र सदनात प्रथम

यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती दिल्लीतील महाराष्ट्र सदनात प्रथम साजरी होत असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. काही लोकांना सावरकरांचं वावडं आहे त्यामुळे त्यांनी या कार्यक्रमाला केलेला विरोध दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले. घराणेशाहीत अडकलेल्या पक्षांकडून या कार्यक्रमात मिठाचा खडा टाकला जात आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

कावीळ झालेल्यांना सगळं पिवळं दिसतं

यावेळी मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती कार्यक्रमासाठी आमंत्रण न मिळाल्याचा आरोप करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, या कार्यक्रमासाठी सगळ्यांना निमंत्रण पाठवलं होतं, सर्व जण तिथे आले होते. सर्व जातीपाती-धर्माचे लोक कार्यक्रमाला होते. कोणालाही डावलण्यात आलं नाही. पण कावीळ झालेल्या लोकांना सगळं पिवळं दिसतं. आजच्या या कार्यक्रमात सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहीजे होतं पण दुर्देव आहे असं त्यांनी म्हटलं.

पालापाचोळ्यासारखे उडून गेले

देशात लोकशाही टिकवायची असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवं असे आवाहन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, लोकशाहीचं हे पवित्र मंदिर आहे. लोकशाही टिकवायची असेल तर त्यांनी सहभागी व्हायला हवं होतं. सगळे एकत्र? २०१९ ला देखील सगळे एकत्र आले होते. पण पालापाचोळ्यासारखे उडून गेले. २०१४ पेक्षा २०१९ ला मोदी साहेबांच्या नेतृत्वात जास्तीच्या जागा आल्या. २०२४ ला देखील सगळे रेकॉर्ड मोडतील. १४० कोटी जनता मोदींच्या पाठिशी आहेत, असं म्हटलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -