Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीTeachers Day : अहो आश्चर्यम्! नाशकात एकाच कुटुंबातील आई - वडील व...

Teachers Day : अहो आश्चर्यम्! नाशकात एकाच कुटुंबातील आई – वडील व मुलाचा वाढदिवस शिक्षक दिनादिवशी

दरवर्षी साजरा करतात अनोखा वाढदिवस…

सिडको : नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे (Krishna Chandgude) यांचा ५ सप्टेंबर रोजी म्हणजेच शिक्षक दिनादिवशी वाढदिवस असतो. पण विशेष बाब म्हणजे त्यांच्या पत्नी ॲड. विद्या चांदगुडे यांचाही याच दिवशी वाढदिवस असतो. इतकंच नाही तर त्यांचा मुलगा आराध्य याचाही या दिवशी वाढदिवस असतो. परिवारातील चौघांपैकी तिघांचे वाढदिवस एकाच दिवशी आल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. दरवर्षी सामाजिक कामे करून ते अनोखा वाढदिवस साजरा करतात.

५ सप्टेंबर हा दिवस भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षकाच्या घरी या दिवशी अपत्य जन्माला आलं तर विशेषच म्हणावं लागेल. नाशिक मध्ये एकाच कुटुंबातील तिघे याच तारखेला जन्माला आले आहेत. कृष्णा यांचे आई-वडील शिक्षक होते. पत्नी ॲड. विद्या यांचे आई वडील देखील शिक्षक होते. त्यामुळे शिक्षक दिनाच्या दिवशी जन्म झाल्याने ते आनंद व्यक्त करतात.

कृष्णा चांदगुडे हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहेत. जात पंचायत मूठमाती अभियानाचे ते राज्य कार्यवाह आहेत. त्यांच्या पुढाकाराने सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा संमत झाला आहे. तर त्यांच्या पत्नी विद्या या वकील आहेत. मुलगा आराध्य हा अकरावीला शिकत आहे. सामाजिक उपक्रम राबवून ते वाढदिवस साजरा करत असतात. एकाच दिवशी तिघांचे वाढदिवस आल्याने मित्र परिवार व नातेवाईक मात्र आश्चर्य व्यक्त करतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

1 COMMENT

Comments are closed.

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -