Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीPankaja Munde supporters : गोपीनाथ मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्यासाठी पंकजा मुंडे...

Pankaja Munde supporters : गोपीनाथ मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्यासाठी पंकजा मुंडे समर्थक आक्रमक

दसरा मेळाव्यात मुंडे समर्थकांकडून जीएसटी कौन्सिलला १९ कोटी देण्याची घोषणा

दादासाहेब खेडकर

पाथर्डी : भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव व माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची राजकीय फरफट थांबताना दिसत नाही. अशातच काही दिवसापूर्वी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला जीएसटी कौन्सिलने नोटीस पाठवून १९ कोटी रुपये थकवल्याने कारवाई केली आहे. या कारवाईचे तीव्र पडसाद राजकीय पटलावर उमटले.

महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाज आणि असंख्य मुंडे समर्थकांनी (Pankaja Munde supporters) याबाबत तीव्र नाराजी दर्शवली. सोशल मीडियावर मुंडे समर्थक आक्रमक होत पंकजा मुंडे यांनी आदेश दिल्यास दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्या वाचवण्यासाठी जीएसटी कौन्सिलला १९ कोटी रुपये त्यांच्या थोबाडावर फेकून मारू, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

महाराष्ट्रातील मुंडे समर्थक आणि सोशल मीडियावर पंकजा मुंडे यांच्या सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यात १९ कोटी रुपये जमा करून पंकजा मुंडे यांच्या स्वाधीन करू अशा पद्धतीची भूमिका घेतली आहे. या सर्व घटनाक्रमावर पंकजा मुंडे यांची अद्याप प्रतिक्रिया आली नसली तरी महाराष्ट्रातील मुंडे समर्थक पंकजा मुंडे यांची होणारी राजकीय कोंडी, राजकीय पटलावरील अवहेलना यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी घटक नाराज असल्याच्या चर्चा आहेत.

“भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव व माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरील राजकीय संकट काळात ठाम उभे राहत दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ कारखाना वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाज आणि मुंडे समर्थक दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर १९ कोटी रुपये काय त्यापेक्षाही जास्त रक्कम जमा करून जीएसटी कौन्सिलचे रक्कम अदा करू. गोपीनाथ मुंडे यांनी समाजावर अपार प्रेम करून त्यांच्या प्रेमातून व ऋणातून उतराई होण्याची संधी प्राप्त झाली आहे.” – अमोल भैया गर्जे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, अहमदनगर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -